पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७१ तया भी सदा मत्सरू दूर जाई पडे निश्चयें स्वस्थता त्यास ठायीं. धरोनी मनीं चार या साधनांतें करा ईश्वरीं नित्य आराधनातें तुह्मां सौख्य लाल-लागेल मागें नव्हे प्राप्त जें मोठिया योगयागें, ५. ६. स्वसाह्य. - कोणतेंही एकादें मोठें काम ह्मटलें ह्मणजे तें माण- साला एकट्याला करितां येत नाहीं; त्यास दुसऱ्यांचें साह्य लागतें. शिवाजी महाराज, पीटर धि ग्रेट, नेपोलि- यन बोनापार्ट इत्यादि थोर पुरुषांनी जे पराक्रम केले, ते देखील दुसऱ्यांच्या साह्यानें केले, ते पराक्रम त्यांस एक- ट्याएकट्यांस करितां आले नसते, ही गोष्ट खरी आहे. परंतु, त्यांचे ठायीं जर स्वसाह्य नसतें - आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर जर त्यांचा पूर्ण भरंवसा नसता - त्यांचे अंतः- करणांत जर कर्तव्यनिश्चय दृढतम नसता, तर, त्यांच्या बाकीच्या मंडळीच्या हातून कांहींएक झाले नसतें. नुसत्या मावळ्यांच्यानें मराठशाही स्थापवली नसती, रशियाच्या प्रधानमंडळीच्यानें आपल्या राज्याची महती वाढवली न- सती, आणि नुसत्या फ्रेंच सैन्याच्याने राज्यक्रांतीचा क ल्होळ मोडवला नसता. एवढी मोठी ग्रहमाला एकसा- रखी चालली आहे, ती सगळी सूर्याच्या गुरुत्वाकर्षणावर मुख्यत्वेंकरून अवलंबून आहे. कोणीएका चतुर ग्रंथ- कारानें असें ह्मटलें आहे कीं, अमेरिकेंतल्या प्रजासत्ताक स्वतंत्र संस्थानांच्या इतिहासामध्यें जार्ज वाशिंगूटन हा -