पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७० आमच्या देशबंधूंस व्हावें, असे प्रयत्न ह्या थोर पुरुषाचे चालले आहेत, ते पाहून आनंद होतो; त्यांस अभिनंदन करून, आणि त्यांचे हे प्रयत्न निरंतर असेच चालून त्यांस यश येवो अर्से परमेश्वरापाशीं मागून, आह्मी त्यांचें हें अ- रूप चरित्र येथें समाप्त करितों. सुखाचीं खरीं साधनें. श्लोक. सुखाचीं खरीं साधनें पांच होती तुझां सांगतों आयका की अहो तीं न तीं मागणे लागताती कुणाशीं पडाया नको त्यांजसाठी प्रयासीं. खरें वागणें हैं किती स्वल्प आहे ! अजाणां सुजाणांस तें साध्य आहे तयानें जिवीं नांदते शांति मोठी तशी ये न संपादिल्या द्रव्यकोटी. धरी नम्रता आवडे तो जनांतें स्वबंधू तसें लाविती सर्व नातें मिळे पाहिजे तें तयाला स्वभावें स्वचित्तीं कुढावें तया हें न ठावें. मनीं तृप्ति ठेवी सदा तुष्ट राहे न कंटाळतां कष्ट दुःखास साहे कधींही कुणाला ह्मणे दे न जो तो स्वतंत्रत्व भोगोनियां पूज्य होतो. परांतें सदा तुष्टवाया झटावें असे एवढें मात्र ज्या काम ठावें १. २. ३. ४.