पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६९ तीवांचून गति नाहीं, हें महानुभवबीज अण्णांच्या मनांत येऊन, त्यांनीं ज्ञानदेवकृत अमृतानुभव ह्या ग्रंथावर अर्थ- निर्णायक सूचना देऊन चांगली टीका छापली आहे. ती फारच उत्तम आहे. ह्या ग्रंथाच्या आरंभी डाक्टरसा- हेबांनीं ज्ञानदेवाचें चरित्र लिहिले आहे. त्यांत शेवटीं असें ह्मटलें आहे कीं, " आत्मज्ञानसंबंधीं जें विवेचन ह्या भरतखंडांत झालें आहे, असें विवेचन कोणत्याही देशांत झालेलें नाहीं. निदान जे यवन आह्मांवर राज्य करीत आहेत, व ज्यांच्या राज्याचा परिणाम सर्वप्रकारें आमच्या तनमनधनांवर झाला आहे असा दृष्टीस पडतो, तथापि ह्या प्रसिद्ध पुरुषाच्या अनुवादानें, प्रकाशाची कवाडें उ- घडून जी आपली नित्यदेखणी दशा, ती आपल्या- जवळ नित्य असतां आपणांला इतरांचें अनुकरण कर ण्याचें अगदीं कारण नाहीं, हाच लाभ. हा सर्वोस या अमृतानुभव ग्रंथाच्या सेवनानें व्हावा, हीच या ग्रंथ छा- पणाऱ्याची इच्छा आहे." एकंदरींत, ज्ञानाचा हेतु डाक्टर कुंटे ह्यांच्या अंतःक- रणांत भरला आहे, तो, ज्ञानदेवांच्या हेतूशीं अगदी बरो- चर मिळतो. त्यांच्या अमृतानुभवाच्या पहिल्या अध्यायाची तिसावी ओवी अशी आहे:- 1- अहो चिन्मात्र जें वस्तु तेथें दुसरा काय हेतु सुखावांचून मातु नाहींच तेथें. ह्मणजे प्रत्येक वस्तु सुखाकरितां निर्माण झाली आहे. आणि ज्ञान ही एक वस्तु आहे. ह्मणून तिजपासून सुख झालेच पाहिजे. सुख होत नाहीं, तें ज्ञान नव्हे. तें सुख ऐहिक आणि पारलौकिक असें दोन्ही प्रकारी