पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६८ मनांत आणून, नानाप्रकारचे पुष्कळ परिश्रम करून, त्यांनीं, एक आगकाड्या तयार करण्याचा कारखाना मुंबईस घातला; आणि विलायतेप्रमाणें येथेंही आपणांस आगकाड्यांसारख्या वस्तु तयार करतां येतील, असें लोकांच्या प्रतीतीस आणिलें. हें काम त्यांनी फार मोठें केलें आहे. डाक्टर कुंटे हे कितीएक वर्षेपर्यंत ग्र्यांट मेडिकल का लेजामध्यें शारीराचे प्रोफेसर होते. त्यांच्या शिष्यव र्गाच्या सांगण्यावरून असें कळतें कीं, आपल्या मनांतला आशय दुसऱ्याच्या अंतःकरणांत बिंबविण्याची कला ह्यांचे ठायीं उत्तम वसत आहे. आपल्या ज्ञानमदानें दुसन्यांस दिपविण्याच्या कामीं परम कुशल अशा परद्वीपस्थांचें तेज ह्यांच्यापुढे कधींच पडलें नाहीं. अभिमानामध्यें योग्य अ भिमान ह्मणून जो एक उत्तम प्रकार आहे, तो अ- ण्णांच्या ठायीं चांगला जागृत आहे. हा योग्य अभिमान व्यक्तीच्या श्रेष्ठत्वास अत्यंत आवश्यक आहे. आणि तोच पुढें राष्ट्राच्या उन्नतीस फार उपयोगी पडतो. एका माणसाच्या देहावर कांहीं शस्त्रक्रिया चालली असतां, एका मोठ्या नामांकित वैद्यराजांनीं, बाह्यात्कारीं शोधकबुद्धीच्या डौलानें, परंतु खरोखर कुचेष्टेनें, अण्णांस तींतलें कांहीं वि- चारिलें. त्यावर त्यांनीं एकदम असे उत्तर दिलें ह्मणून सांगतात की, " प्रश्नाचें उत्तर द्यायाचें काम माझें नाहीं; उत्तर ऐकायाचें काम माझें आहे." तें ऐकून ते चूप राहिले. केवळ दैहिक आणि व्यावहारिक उन्नतीनें मनुष्याच्या सुखाची पूर्णता होत नाहीं, त्यास आत्मिक उन्नति पाहिजे,