पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६७ - - डी. ही पदवी वैद्यक विद्येतल्या नैपुण्याच्या परमावधीची होय. ती ह्यांनीं आमच्या इलाख्यांत, आह्मां एतद्देशीयांमध्यें, प्रथम मिळविली - ह्मणजे हे आमच्यांतले पहिले एम्. डी. - धन्वंतरिशिरोमणि आहेत हे त्यांस फार मोठें भूषण आहे. हे आपल्या धंद्याच्या कामांत फार निष्णात आ- हेत. चिकित्सेमध्यें ह्यांची बरोबरी करणारे धन्वंतरि सांपडणें कठिण. आपलें काम आपणांस जितकें चांगलें क- रतां येतें तितकें चांगलें करायाचें, असें ह्यांचें व्रत आहे. पाश्चिमात्य वैद्यकाचा अभ्यास उत्तम प्रकारें करून ह्यांनीं ह्या देशांतल्या वैद्यकाचेंही अध्ययन चांगलें केलें आहे. जर स्वराज्य असतें, आणि नानाप्रकारचे शोध करण्यास ह्यांस जर राजसाह्य मिळालें असतें, तर, पाश्चिमात्यांनीं चकित होऊन रहावें, असे शोध ह्या गृहस्थांकडून ख- चीत झाले असते. वाग्भट ह्मणून जो आमचा मोठा वैद्यक - ग्रंथ आहे, तो यांनीं छापला आहे; व तेणेंकरून वैद्यजनांस मोठें साह्य झालें आहे. शिवाय, स्त्रीरोगचिकित्सा ह्मणून एक फार चांगलें पुस्तक ह्यांनी लिहिले आहे. विद्येचा खरा परिणाम ह्यांच्या अंतःकरणावर झाला आहे; आणि जनहित करणें हें विद्यासंपादनाचें खरें सार्थक्य आहे, हे त्यांच्या अंतःकरणांत पूर्ण बिंबलें आहे. सगळ्यां- मध्यें आत्म्याच्या खालोखाल श्रेष्ठ वस्तु ह्मणजे शरीर; त्याच्या रोगाचे दूरीकरणाचा तर ह्यांचा मुख्य व्यवसाय आहेच, आणि तें मोठें काम ते उत्तम रीतीनें करीत आ हेत. पण तेवढ्यानें त्यांच्या अंतःकरणाची तृप्ति झाली नाहीं. कलाकौशल्याच्या कामांत आपले लोक पुढे आल्यावांचून त्यांचा अभ्युदय व्हावयाचा नाहीं, हें खरें व्यवहारतत्त्व ●