पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टिलर्फ 7, वाई २३ लोक काय बोलतात. विधवांचें वपन करूं नये अशाबद्दल येथील न्हावी लोकांत कांहीं विचार चालला आहे. चांगला आहे. पुण्यांतला नानाचा वाडा सरकार डेक्कन एज्युकेशन सोसैटीच्या ताब्यांत देणार असें समजतें. फार चांगलें. मुंबई इलाख्याची तिसरी प्रांतिक सभा पुण्यास येत्या मे महिन्याच्या ५, ६, ७, व ८ ह्या तारखांस भरणार आहे. मि. ए. ओ. ह्यूम व बाबू सुरेंद्रनाथ बानर्जी हे गेल्या महिन्यांत विला- यतेस जाण्याकरितां आगबोटीतून चालते झाले. मि. क्राफर्ड हे क्राफर्डकमिशनसंबंधानें आपणांस झालेला खर्च स्टेट सेक्रेटरीकडे मागत आहेत; आणि तो त्यांस मिळेल असें ह्मणतात ! ! ! जर्मनीचे नवे बादशाहा दुसरे विल्यम व प्रिन्स बिस्मार्क यांचें जमत नाहीं. प्रिन्स बिस्मार्क यांनी आपली प्रधानगिरी सोडिली आहे. रा० रा० रावजी शास्त्री देवकुळे, यांस गेल्या महिन्याच्या बाविसाव्या तारिखेस धुळे येथें देवाज्ञा झाली. फार फार वाईट झालें. हे गणितवि- षयाच्या पारंगततेवरून प्रसिद्ध होते. जर्मनींत एक चमत्कारिक मनुष्य आहे. त्याचें शरीर इतकें पारदर्शक आहे की, त्याच्या आंगांत रक्त फिरतांना दिसतें. त्याच्या पायांत मुळींच हाड नसल्यामुळे याला गाडींत घालून फिरवावें लागतें. व्हिक्टोरिआ महाराणीचे नातू प्रिन्स व्हिक्टर हे हिंदुस्थानचा प्रवास संपवून गेल्या महिन्याच्या २८ व्या तारिखेस स्वदेशीं जाण्याकरितां आग- बोटीवर चढले. त्यांच्या सन्मानार्थ मुंबईत पुष्कळ पैशाची उधळपट्टी झाली. हिंदुस्थानसरकारचा सन १८८८-८९ चा नक्की जमाखर्च प्रसिद्ध झाला आहे. त्या सालांत उत्पन्नांतून खर्च वजा जाऊन ३,७०,००० रुपये शिलक राहिली आहे. सन १८८९-९० सालीं सुमारें २,७३,३३,००० रुपये शिलक राहील असा अजमास आहे.