पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२


 डाक्टर मनरो ह्मणतातः – “ थोडी बेताची दारू पितात त्यांपेक्षां, मुळींच दारू पीत नाहीत, त्यांस आरोग्य चांगलें असतें, दुखणें फार क्वचित येतें, आणि त्यांत माणसें थोडीं मरतात. "

 डाक्टर रिचर्डसन ह्मणतातः – “ मद्य हे जसें कोणतेंही हित होण्यास उपयोगीं नाहीं, तसें तें दुःखाचें मूळबीज आहे. त्याचें सेवन होऊं लागलें ह्मणजे माणसाच्या नाशास आरंभ होतो; आणि तें सेवन पूर्ण झालें कीं त्याचा नाश पूर्ण होतो. "

 सर जान हाल ह्मणतात कीं,“ आरोग्यरक्षणास कोणत्याही प्रकारचें मद्य आवश्यक नाहीं, असें माझें मत आहे. "

 सर विलियम गल्ल ह्मणतातः – “ मद्य हें अत्यंत नीच प्रकारचें विष आहे. "

 डाक्टर चेने ह्मणतातः – “ अगदीं बेताचें मद्य पितात, ते देखील अल्पायुषी होतात.

 मद्य, तमाखू आणि अफू ह्यांचें सेवन करूं नये.

 शंभर रुपये घेईन-दोनशें रुपये देईन – कोर्टाचें काम चाललें असतां एका पक्षकारास मनस्वी खोकला आला. तो कांहीं केल्या राहीना. तेव्हां न्यायाधीशास राग येऊन तो त्यास ह्मणाला, 'खोकर्णे बंद कराल तर बरें आहे, नाहींतर शंभर रुपये दंड घेईन, लक्षांत ठेवा." त्यास, खोकतां खोकतांच त्या पक्षकारानें उत्तर दिलें, “रावसाहेब, जर हें खोकर्णे आपण बंद केलें तर मी आपल्याला दोनशें रुपये देईन." न्यायाधीश हिरमुसला होऊन चूप बसला.