पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५० चालण्यास वस्तुस्थितिवैचित्र्य हें आवश्यक आहे. पर्वत असल्यावांचून पृथ्वीवर नद्या वाहावयाच्या नाहींत. खोरीं असल्यावांचून पाणी सांचावयाचें नाहीं. त्याप्रमाणें, म- नुष्यांस सामाजिक सुख प्राप्त होण्यास त्यांच्या स्थितीमध्यें वैचित्र्य असावें, समता नसावी, हें आवश्यक आहे. सगळेच धनी झाले, तर त्यांची चाकरी कोणी करावयाची ? एका घरांत पांचचार यजमान झाले, तर त्यांमध्यें अ- धिकार कोणाचा चालावयाचा ? सांगावयाचें तात्पर्य मि- ळून इतकेंच कीं, मनुष्याच्या योग्यतेंत वैचित्र्य असणें अवश्य आहे. पृथ्वीच्या पाठीवर कितीएक देश असे आहेत की, त्यांतल्या लोकांस अभेदसमतेचा मोठा अभिमान आहे. ते अर्से ह्मणतात की, आमच्या देशांत लहानमोठें कोणी नाहीं; सगळी माणसें सारखी आहेत. परंतु, तो भ्रम आहे. राज्यसत्ता टा- अमेरिकेंतलीं संस्थानें, इंग्लंडाची कून देऊन स्वतंत्र झालीं, ह्या गोष्टीस आज शेंसवारों वर्षे झालीं. तीं स्वतंत्र झालीं, तेव्हां त्यांनी एक मोठा जा- हीरनामा प्रसिद्ध केला. त्यांत असें ह्मटलें आहे कीं, “आह्मी ही गोष्ट अगदी निर्विवाद समजतों की, माणसें तेथून सगळीं सारखी आहेत; आणि त्यांस परमेश्वरानें कांहीं अधिकार असे दिले आहेत कीं, ते त्यांजपासून कधींही काढून घेतां यावयाचे नाहींत. आणखी ह्या अधिकारांतच, जीव, स्वातंत्र्य आणि सुख संपादण्याचे प्रयत्न ह्यांची गणना आह्मी करितों." बरें. हें जरी एक वेळ खरें ह्मटलें तरी, सर्व माणसें स्वतंत्र आहेत- कोणी कोणाचे गुलाम नाहींत - अमक्याच्या हितार्थ अमक्यांनीं मरावें असें -