पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५१ परंतु, कांहीं नाहीं - एवढे मात्र कबूल करितां येतें; आणि ते- वढ्यापुरतीं सगळीं माणसें सारखीं ह्मणतां येतात. आईबाप आणि मुलें ह्यांच्या संबंधांचा विचार केला ह्मणजे अर्से स्पष्ट दिसून येतें कीं, अगदी कायद्याप्रमाणें झटलें तरी, एकवीस वर्षे वयास होतपर्यंत, आईबापांइतकें स्वातंत्र्य मुलांस प्राप्त होत नसतें. तीं कायद्यांत येत- पर्यंत त्यांस त्यांच्या आज्ञेत राहावें लागतें. तें एक असो. दुसरें, पुरुष आणि स्त्रिया ह्यांच्या सं- बंधानें कसें आहे तें पाहा. पृथ्वीच्या पाठीवर जितके पुरुष आहेत, तितक्याच बायका आहेत; त्यांत फारसें अंतर नाहीं. आणखी, कायद्याच्या दृष्टीने पाहिलीं अ- सतां, तीं सगळीं सारख्या अधिकाराची आहेत. शिवाय सृष्टीच्या व्यवहारांत पुरुषांची जितकी गरज असते, तित- कीच स्त्रियांची असते. परंतु, ज्या देशांत स्त्रियांस पु- प्कळ स्वातंत्र्य दिलें आहे, त्यांत देखील, राज्यकारभारांत त्यांस घेत नाहींत. कायदे करण्याचें काम पुरुषांनीं आ- पल्या हातीं घेतलें आहे. त्यांत आणि राज्यकारभारांत बायकांस कोणी घेत नाहींत, ह्यांतलें बीज हेंच आहे कीं, पुरुष आणि स्त्रिया हीं जरी सगळीं माणसें आहेत आणि माणसें ह्या नात्यानें जरी सारखी आहेत, तरी - स्त्रियांस ई- श्वरदत्त गुण आणि अधिकार हीं जीं आहेत, तीं पुरुषांच्या आंगच्या गुणांहून आणि अधिकारांहून भिन्न आहेत. तेव्हां, राजकीय वगैरे मोठमोठ्या व्यवहारांमध्ये स्त्रियांपेक्षां पुरुषांचें अधिक चालावें, आणि त्याच्या योगानें पृथ्वीच्या पाठीवर पुरुषांचें श्रेष्ठत्व विशेष असावें, हें अगदी साह- जिक आहे. -