Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४९ असे कीं, सगळ्या माणसांच्या ठायीं चांगलेवाईट गुण एकसारखे नसतात; आणखी, मनुष्य श्रेष्ठ किंवा कनिष्ठ होणें हें त्याच्या आंगच्या चांगल्या किंवा वाईट गुणांवर असतें. एकादें मनुष्य शरीरानें बळकट आणि निरोगी असतें, आणि एकादें माणूस, जन्मापासून, अशक्त आणि आजारी असतें. एकाद्या मनुष्याला बुद्धि चांगली असते, एका- द्याला अगदी कमी असते. एकादें माणूस सुस्वरूप असतें, एकादें व्यंग आणि कुरूप असतें. एकादें स्व- भावतःच मोठें सभ्य आणि मर्यादशील असून दुसऱ्यांस आवडतें, आणि एकादें जन्मतःच अडाणी, वेडगळ आणि पाहिल्याबरोबर कंटाळा यावा असे असतें. सृष्टीच्या रचनेकडे पाहा. ग्रहमालेंतले सगळे ग्रह सारखे नाहींत. ह्या आपल्या पृथ्वीच्या रचनेकडे पाहा. हिजवर कोठेंकोठें पर्वत इतके उंच आहेत कीं, त्यांचीं शिखरें मेघमंडळास भेदून गेलीं आहेत; कितीएक खोरीं अशीं आहेत की, त्यांस अद्यापपर्यंत कधीं सूर्यदर्शन नाहीं. कांहीं मोठमोठी मैदानें उत्तम प्रकारच्या सुगं- धी फुलांनीं आणि अमृतासारख्या गोड फलांनीं भरलीं आहेत; आणि कांहीं वाळवंटें अशीं आहेत कीं, तेथें वनस्पतीचें कधीं दर्शन व्हावयाचें नाहीं. कितीएक ठिकाणें अशीं आहेत कीं, त्यांत पाणी जिकडेति- कडे विपुल वाहत आहे; आणि कांहीं अशीं आहेत कीं, त्यांत डोळ्यांस लावायास पाण्याचा एक थेंब देखील मि- ळावयाचा नाहीं. ह्या सगळ्या गोष्टींवरून विधात्याची योजनाच अशी दिसते कीं, सृष्टीमध्यें व्यवहार बरोबर