पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४८ अर्थानें रमवावें मतितें कर्णास सरस यमकांहीं यावेगळा प्रयत्न ध्यानीं धरिला पहा कधीं नाहीं. अर्थाइतकी नाहीं तरि यमकी विपुल लाधते गोडी तीचा उपभोग करी रसिक अशी मंडळी असे थोडी. वरि बहु कंटक पाहुनि अज्ञ मुलें निंदितात फणसातें तो न्याय इथें दिसतो हें वदणें कठिण लागतें मातें. माझ्यापेक्षां सुंदर काव्य जनां द्या रचोनियां नीट मग परनिंदा नलगे जीचा येतो महाजनां वीट. मधुरस मिळतां कोणी सांगा घेईल काय हो गूळ हें निजकर्तव्याचें शिकवावें काय मीं तुझां मूळ. मम निंदेचें मजला तिळभर देखील दुःख ना वाटे अरसिकतेतें तुमच्या कृतघ्नतेतें बघोनि मन फाटे. "काव्य करावें म्यां नच वचकावें दूषितो परि लघूस कां न सदन बांधावें की त्यांत पुढें बिळें करिल घूस." १४. हें मीं आहे झटलें पूर्वी तें ह्मणुनि अल्प विनतीतें करितों पूर्ण करावा विचार हीचा धरोनि सुमतीतें. ८. ● ९. १०. ११. १२. १३. १५. माणसें तेथून सगळीं सारखीं. प्रत्येक माणसास अप्रतिबंध स्वातंत्र्य असणें हें आव- श्यक आहे, आणि त्यापासून सर्वोस सुख होईल, असे कितीएक लोकांस वाटतें; त्याप्रमाणेंच कांहीं लोकांस असें वाटतें कीं, सर्व माणसांची योग्यता सारखी असणें, ह्मणजे सर्वांमध्यें अभेदसमता असणें हें आवश्यक आहे, आणि तें त्यांस फार सुखावह होईल. परंतु, ही सगळी भ्रांति आहे, आणि आधीं मुळीं तें होणें अशक्य आहे. ह्याचें अगदी पहिलें मोठें कारण