पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४७ कला एवढेंच केवळ नव्हे, तर त्याची बायको जांटिपी ही केवळ कृत्या होती, तिनेंही त्याचे फार हाल केले. परंतु, कितीही दगड टाकिले तरी जसे समुद्रांत गडप व्हावे, तसे ते सगळे आघात त्या साधुपुरुषाच्या शांतींत गडप झाले. सांप्रतकाळीं साक्रेटिसाचें नांव सगळ्या विद्याचारसंपन्न राष्ट्रांतल्या पुरुषांस अत्यंत वंद्य झालें आहे. साक्रेटिसानें स्वर्गीची नीति पृथ्वीवर आणिली असं ह्मणतात. ह्या पूज्य पुरुषांस वंदन करून आह्मी हें चरित्र समाप्त करितों. मोरोपंताचा विलाप. आर्या. हर हर काय करावें आला विपरीत काल लोकांसी विसरोनि स्वत्व सकल परकीयां लागले भजायासी. वाङ्मन पूत कराया केली हरिकीर्तनावरी कविता ती काशीक्षेत्रींचा रसिक जनसमूह जाहला स्तविता. मर्मज्ञ रामजोशी ह्यांनाही वाटली पसंत तरी आलीकडील जन हे वाइट ह्मणती तिला अनेकपरी. श्रीवाल्मीकिव्यासप्रभृतींहीं संस्कृतांत जें लिहिलें त्याचें जनबोधार्थ प्राकृत केले यथामती वहिलें. तें आधीं वाचावें पाहावें नीट लक्ष लावून मग काय बोलणें तें बोलावें अधिक काय वा ऊन. आधी सर्व न बघतां ह्मणणें वाईट हें असें खोटें मिरविति सुज्ञत्व तयां लांछन हें वाटतें मला मोठें. प्राकृत जनां कळावें संस्कृत काव्यांतलें रहस्य खरें हा हेतु धरुनि रचिले ग्रंथ न इंगित मुळीं असे दुसरें. ७. ४. ६.