Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४६ केल्याचें पाहिल्यावर जवळची मंडळी फार रडूं लागली. त्यांस तो शांतमुद्रेनें ह्मणाला, "अहो मित्रांनो, तुझीं हें मांडिलें आहे काय ? अरे, अंतकाळीं परमेश्वराचें नांव मला स्वस्थ चित्तानें घेऊं द्या. बडबड कमी करा.” असें बोलून, चैन पडेना ह्मणून तो इकडेतिकडे हिंडूं लागला, आणि पाय दुखून आलेसे वाटल्यामुळे आंथरुणावर पांघरूण घे ऊन जो निजला, तो निजलाच. पुनः उठला नाहीं. ही गोष्ट इसवी सनापूर्वी ३९९ व्या वर्षी वडली. तेव्हां हा साधु एकुणसत्तर वर्षीचा होता. जसा रामदासस्वामींचा पट्टशिष्य कल्याण होता, तसा साक्रेटिसाचा पट्टशिष्य झेनोफन हा होता. त्यानें साक्रे - टिसाचें वृत्त लिहिलें आहे, त्यांत शेवटीं असें ह्मटलें आहे की, "साक्रेटिस हा इतका धार्मिक होता कीं, देवाच्या आज्ञेवांचून तो कांहीं करीत नसे; इतका न्यायवर्ती होता की, त्याचे हातून कधीं कोणाला दुःख झालें नाहीं; इतका सुशील होता कीं, नेमस्तपणा आणि प्रामाणिकपणा ह्यां- च्यापुढे त्याला आनंद आणि सुख ह्रीं कांहींच वाटत नसत; इतका शाहाणा होता की, त्याला बरेवाईट कळवून घे- ण्यास कधीं कोणाला विचारावें लागत नसे; त्याला मनुष्याची पारख फार उत्तम असे; कर्तव्याकर्तव्य तेव्हांच कळत असे; व्यसनी माणसांची फजीती उडवावी, आणि सद्गुणी मा- णसांची प्रशंसा करावी, हे त्याचें अखंड व्रत असे; ह्मणून, तो सर्व माणसांत अत्यंत सद्गुणी आणि अत्यंत सुखी असा पुरुष होता." शब्दशः खरें आहे. साक्रेटिस हा दया, क्षमा, शांति, सत्य, परोपकार इ- त्यादि गुणांची केवळ मूर्ति होता. त्याचा छळ लोकांनी