पुष्कळ छळ मांडिला. तेथें कितीएक महिने लोटल्यावर, राजाला असे वाटलें कीं, फिलोक्षेनिस हा आतां नरम आला असेल, आणि त्याला आपण बोलावून आणून त्याचा आदरसत्कार केला, ह्मणजे तो सहजच आपल्या कवितेची स्तुति करील. त्याप्रमाणे त्यानें त्याला प्रतिबंध मुक्त करून, आपले पंक्तीस जेवायास बोलाविलें, आणि त्याचें फार आदरातिथ्य करून, त्या राजानें, आपल्या काव्यांतला एक आवडता चुटका मोठ्या सुरावर गायास आरंभ केला. त्यास कांहीं पळें लोटल्यावर, फिलोक्षेनिस हा, एकदम पंक्तींतून उठून, दाराबाहेर चालला. त्यास परत बोलावून आणून राजानें विचारलें, “कां ! आपण
चाललां कोठें ?" त्यास त्यानें सरळ उत्तर दिलें, "मी कारागृहांत जातों. " त्या उत्तरांतला पेंच त्या राजास तेव्हांच कळला; पण, चमत्कार असा कीं, त्याला त्याचा राग आला नाहीं, एवढेच नव्हे; तर, त्याच्या निःसीम सत्वशीलतेबद्दल त्याची वाहवा करून, त्यानें त्याला मोठें बक्षीस दिलें; आणि त्यास आपल्या दरबारांतला सरदार बनविलें.
मादक पदार्थांविषयी मोठ्या धन्वंतऱ्यांची साक्ष कशी पडते ती पहा.
प्रोफेसर हिचकाक ह्मणतातः – " मद्य, अफू आणि तमाखू हीं सगळीं भावंडे आहेत असें मी समजतों. त्यांस
सर्वथा शिवूं नये. कां कीं तीं विषारी आहेत.
डाक्टर पार्कस् ह्मणतातः— “ मद्य जर मुळींच नसतें, तर ह्या जगांतलें पाप आणि दुःख हीं पुष्कळ कमी
झालीं असतीं. "