पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४५ कडून एकादी गोष्ट कबूल करविणें ह्यांत त्याचा हातखंडा असे. आणि हें सर्व तो निरनिराळे प्रश्न करून साधीत असे. ह्मणून ह्या पद्धतीस साक्रेटिसपद्धति असें नांव पडलें आहे. ते त्याचे वादविवाद अत्यंत बोधप्रद आणि मनोरम आहेत. Y तुरुंगांतून हळूच पळून जाण्याविषयीं क्रेतो हा त्याला आग्रह करूं लागला. त्यास साक्रेटिस गंभीर मुद्रेनें ह्मणाला, "बाबा, क्रेतो, स्वदेश हा सगळ्या सोय- ज्याधायऱ्यांपेक्षां, किंबहुना आईबापांपेक्षां सुद्धां मनुष्यास अधिक वंदनीय आहे; त्यानें त्यास गौरविलें पाहिजे. अरे मित्रा, मी पळून जाण्यास उभा राहिलों, आणि ह्या सं- स्थानाचे सगळे कायदे एकवटून मानवस्वरूप धरून मज- पुढे आले आणि ह्मणाले कीं, अरे साक्रेटिसा, कृतघ्ना, दुष्टा, ज्या देशानें तुला जन्म दिलें, ज्या देशांत तूं ल- हानाचा मोठा झालास, आणि ज्या देशांत तुला विद्या प्राप्त झाली, त्या देशाचे जे कायदे आह्मी आहोत, त्या आमचें उल्लंघन करून, पळून जाण्यास तुला कांहीं लज्जा वाटत नाहीं काय, तर मी त्यांस काय उत्तर देऊं?" असें ह्मणून तो जागचेजागी स्तब्ध राहिला. अंतकाल समीप आला असें जरी त्याला समजलें, तरी, त्याचें धैर्य तिळमात्रही खचलें नाहीं. त्याची वृत्ति अगदी शांत होती. तो जवळच्या मित्रांस ह्मणाला, " सज्जनांस मानवदेह हें कारागृह आहे; त्यांतून सुटून जाण्यास त्यांस दुःख होत नसतें. मनुष्यमात्रानें, क्षणभरही उ पेक्षा न करितां, निरंतर सद्गुण आणि सद्विद्या हीं प्राप्त करून घेण्याविषयीं अंतःकरणपूर्वक झटावें." विषप्राशन