पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४४ कधीं गरीबी जाणवली नाहीं. मासिदोनिया देशाचा राजा आर्चिलेयस ह्यानें त्यास, कांहीं संभावना करण्याकरितां, आपल्या दरबारीं येण्याविषयीं मोठ्या आर्जवानें बोलावणे पाठविलें. त्यास त्यानें असे सांगून पाठविलें कीं, "म- हाराजांचे उपकार मजवर होतील ते फेडण्याचें सामर्थ्य मला नाहीं, ह्मणून मी महाराजांकडे येत नाहीं." ही खरी निस्पृहता. त्या देवाविषयीं आणि राज्याधिकाराविषयीं त्या वेळच्या लो- कांच्या मनांत भलभलत्याच कल्पना भरल्या होत्या. काढून टाकण्याकरितां, तो जीं भाषणें करी, तीं तेव्हांच्या अधिकाऱ्यांस विषवत वाटत, आणि त्यावरून त्यांनीं असा निश्चय केला कीं, हरप्रयत्न करून, साक्रेटिसाचा जीव घ्यावयाचा. त्यांमध्यें मेलिटस आणि आनिटस हे दोघे प्रमुख होते. ह्मणून, त्यांनीं त्यावर राजद्रोहाचा, ना- स्तिकपणाचा आणि तरुण लोकांस बिघडविण्याचा आरोप आणिला, आणि, न्यायाधीशांनीं तो खरा ठरवून, त्यास देहान्त प्रायश्चित्ताची सजा दिली. तरी तो नीतिशूर पुरुष तिळभरही डगमगला नाहीं. बोध आणि उप- देश करण्याचा त्याचा झपाटा चाललाच होता; आणि त्याची आनंदवृत्ति तिळमात्रही कमी झाली नव्हती. अ- पालोद्रोरस हा त्याचा मित्र त्यास एकदां ह्मणाला, "म- हाराज, आपण निरपराध असून मरतां, हें पाहून मला फार दुःख होतें." त्यावर साक्रेटिसानें उत्तर दिलें, "तर मग तुझ्या मनांत काय म्यां अपराधी असून मरावें ? " अशा प्रकारें कोटिक्रमयुक्त भाषण त्याला उत्तम साधत असे. दुसऱ्याच्या मनांत एकादी गोष्ट भरविणें किंवा एकाद्या-