पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४३ तो, आपल्या देशाच्या रूढीप्रमाणें शिपायगिरीचें काम शिकला, आणि त्यानें मोठमोठ्या तीन लढाया पाहिल्या. त्यांतल्या एका लढाईत त्यानें, आपला शिष्य झेनोफन ह्याचा जीव वांचविला. समरांगणीं कोणी घायाळ होऊन पडला असतां, त्यास पाठोंगळीस घेऊन सुरक्षित ठिकाणीं नेऊन ठेवावें, हें एक त्याचें मोठें ब्रीद होतें; आणि त्यांत तो आपल्या जीवाकडे पाहात नसे. "भूतांची दया हैं भांडवल संतां, आपुलिया ममता नाहीं देहीं." तें हैं. साक्रेटिसाला कांही दिवस न्यायाधीश नेमिलें होतें. तें काम त्यानें उत्तम प्रकारें बजाविलें. तरी, त्या संबं- धानें व इतर कामांच्या संबंधानें त्यास जी व्यंगें आढळलीं, तीं त्यानें उघड बोलून दाखविलीं; आणि त्यांचा निषेध केला. त्यावरून त्यास पुष्कळ शत्रु उत्पन्न झाले; आणि त्याजवर भलभलते आळ घालून ते त्याचा छळ करूं ला- गले. त्याची आईबापें हलक्या धंद्यांची माणसें होतीं, त्यांवरून ते त्याला लावून बोलत, तेव्हां तो त्यांस ह्मणे कीं, "माझा बाप पाषाणास मानवस्वरूपाचें सादृश्य आणीत असे, हें कांहीं वाईट नव्हतें." त्याप्रमाणेंच, तो आपल्या आईविषयीं ह्मणे कीं, “ती लोकांच्या मुलांचें सुईणपण करीत असे, तसें मी लोकांच्या सद्गुणांचें सुईणपण क रितों; - ह्मणजे त्यांच्या हृदयांत जे उत्तम गुण आहेत, ते प्रगट होत असे करितों." खरोखरच तें सुईणपण आहे. तें सुईणपण आईबाप, शिक्षक आणि साक्रेटिसासारखे गुरु ह्यांजकडे असतें. तें त्यांनीं करावें. साक्रेटिसाची सगळी जिनगी एकशेंवीस रुपयांची होती. परंतु, तो अत्यंत निर्लोभ असल्यामुळे त्याला