पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४२ उदाहरणें जगाच्या इतिहासांत फार थोडी आहेत. त्या थोड्यांतही, जनास सन्मार्ग दाखविण्याकरितां केलेल्या निश्चयास प्राणार्पण केल्याचें उदाहरण, प्रसिद्ध असे ब हुधा एकच आहे. तें साक्रेटिसाचें होय. त्याचें चरित्र आह्मी येथें सादर करितों. ग्रीस देशामध्यें प्राचीन काळीं अत्तिका या नांवाचा एक प्रांत होता. त्यांत साफोनिकस ह्या नांवाचा कोणी एक गरीब माणूस राहात असे. तो पाषाणमूर्तिकाराचा धंदा करीत असे, आणि त्याची बायको फानारिती ही सुईणपण करीत असे. तीं उभयतां सुशील होतीं; आणि आपला गरी - बीचा प्रपंच मोठ्या बेताबातानें करीत असत. त्यांस, इसवीसनापूर्वी ४६८ वे वर्षी एक मुलगा झाला. त्याचें नांव त्यांनीं साक्रेटिस ठेविलें. थोडा मोठा झाल्यावर साक्रेटिसास त्याच्या बापानें पा- षाणमूर्तिकाराचें काम शिकविलें. त्यांत त्याची चांगली गति झाली; परंतु, कांहीं वेळानें, कोणत्या कारणावरून तें कोण जाणे, त्याचें लक्ष तत्त्वविचाराकडे लागलें. आणि तेव्हांचे विद्वान् लोक गहन विषयांवर जीं व्याख्यानें देत, त्यांस तो जाऊं लागला. त्यांनी त्याचें चित्त फारच वे- वक्तृत्व, कविता, वाद्यविद्या, आणि गणितशास्त्र हीं त्याला आवडत असत. आणि तत्त्वविचार आणि मान- सशास्त्र हीं त्याला अतिशयित प्रिय वाटत असत. शेवटीं तो तर्कशास्त्रांत इतका प्रवीण झाला कीं, कोणाशीही वाद करण्याचा प्रसंग आला, तरी तो त्याला आपलें मत कबूल करायास लावी. त्यावरून त्याची मोठी ख्याती झाली. असा तो नुसता विद्वान् होऊन वरांत बसला नाहीं. धलें. &