पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३९ लोक काय बोलतात. काबूलचे अमीर ह्यांस संधिवात झाला आहे. हिंदुस्थानांत फुलझाडांच्या जाती १५,००० आहेत. श्रीमंत होळकर सरकारास पुत्र झाला. शतायु भाग्यवान् होवो ! प्रोफेसर वर्डस्वर्थ ह्यांस डाक्टर ही पदवी मुंबईच्या युनिव्हर्सिटीनें दिली. महारोगाचे संबंधाने चौकशी करण्यासाठी एक डाक्टरांचें कमिशन स- गळ्या हिंदुस्थानभर फिरत आहे. राजा सर टी. माधवराव सामाजिक सुधारणेच्या मंडळींतून निघाले, व राजकीय सुधारणेच्या मंडळींतूनही निघाले !! रशियाचे शाहाजादे हिंदुस्थानांत आले आहेत. त्यांच्या आदराति- ध्यार्थ निजाम सरकारानें दोन लाख रुपये खरचिले ! रा. जोती गोविंदराव फुले हे गेल्या नोवेंबरांत मरण पावले. हे ब्रा- ह्मणेतरांचे मोठे कैवारी होते. हे वाईट ब्राह्मणांस शिव्या देत असत, मि. फेरोजशाहा मेरवानजी मेहता हे गेल्या महिन्याच्या २६ व्या तार- खेस कलकत्यास भरलेल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष झाले होते. त्यांनीं आपली कामगिरी उत्तम रीतीनें बजाविली. प्रतिनिधि चौदाशें आले होते. आहे. व्याजबट्टा करणारे मारवाडी वगैरे लोक गरीब लोकांपासून फार व्याज घेऊन त्यांस बुडवितात, ह्मणून त्या सर्वांची नोंदणी करून त्यांनीं ध्यावयाच्या व्याजाचा कमाल दर ठरवून टाकावा, अशाबद्दल खटपट चालू गेल्या महिन्याच्या १७ व्या तारिखेस सकाळी चार वाजतां मुंबई श- हरांत एक नवीन बांधलेलें घर अकस्मात कोसळलें, आणि त्याच्या खाली सांपडून २९ माणसें मरण पावलीं !! वाहवारे म्युनिसिपालिटीची देखरेख. प्रिन्स बिस्मार्क है जर्मनीचे माजी बादशाहा पहिले विल्यम ह्यांचें चरित्र