Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३८ असें कीं, एकदा लोकांची मनें एकवटलीं, ह्मणजे, राजा कितीही जरी जुलमी असला, तरी त्यास आपला दुराग्रह सोडून देऊन, लोकांसारखें व्हावें लागतें. तेव्हां, जेथें राजा प्रजेसारखा होत नाहीं, तेथें प्रजा दुर्बल आहे-रा- जाचें मन वळविण्यास समर्थ नाहीं, — असे समजावें. - बेनजामिन स्फुट. फ्रांकलिनाचें वेळापत्रक. ५ पासून ८ पर्यंत. ८ पासून १२ पर्यंत. } १२ पासून २ पर्यंत. } २ पासून ५ पर्यंत } ५ ५ पासून ९ पर्यंत निजून उठणें ; प्रातःस्मरण; उद्यो- गाविषयी विचार; त्याविषयीं निश्चय; अभ्यास; न्याहरी; आज सत्कृत्य कोणतें करावयाचें, ह्याचा विचार करणे. उदरनिर्वाहाचा उद्योग करणें. वाचणें,घरचा हिशेत्र पाहाणें, जेवणें. उदरनिर्वाहाचा उद्योग करणें. वस्तु जागचे जागीं ठेवणें, संध्याकाळचें जेवणें, गानवादन, खेळणें, संभाषण, दिवसा काय सत्कृत्य केले त्याचें मनन. ९ पासून ५ पर्यंत. } निद्रा. ह्यामध्यें, आज सत्कृत्य कोणतें करावयाचें हें प्रातःकाळी ठरविणें, आणि आज मीं कोणतें सत्कृत्य केलें हें सायंकाळी पाहाणें, ह्या दोन गोष्टी फार विचार करण्यासारख्या आहेत. ह्या प्रत्येक मनुष्यानें पाहाव्या. हित होईल.