Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४० लिहीत आहेत. सध्याचे बादशाहा दुसरे विल्यम हे ह्मणत आहेत कीं तें चरित्र माझ्या नजरेखालून गेलें नाहीं तर तें मी प्रसिद्ध करूं देणार नाहीं. यावर बिस्मार्क ह्मणतात की, मी तें इंग्लंडांत प्रसिद्ध करीन ! ! ! हिंदुस्थानांत कायदेकौन्सिलांच्या सुधारणेच्या संबंधाच्या कायद्याचा एक नवीन मसुदा मि. ब्राडला ह्यांनी पार्लमेंटापुढें रुजू केला आहे. यांत, सुप्रीम व प्रांतिक कौन्सिलांतल्या मंत्ररांची संख्या पुष्कळ वाढवावी असें असून त्या मंत्ररांपैकीं एकतृतीयांशापेक्षां कमी नाहींत, व अध्यीपेक्षा जास्ती नाहींत, इतके मेंबर लोकांनीं निवडलेले असावे, अशी सूचना आहे. हे लोकनियुक्त सेंबर निवडण्याचा अधिकार लोकसंख्येपैकीं निदान शेंकडा दोन लोकांस असला पाहिजे. इंग्लंडांत वीजगाडी चालू झाली आहे. ती दर तासास पंधरा मैल चालते. सगळ्या डब्यांत येथून तेथून एक वाट आहे. डब्यांच्या प्रती नाहींत. सगळ्या बांकांवर गाद्या मारलेल्या आहेत. अंतर कितीही कम- जास्त असो; दर एक; ह्मणजे पोष्टाच्या तिकिटांसारखा. गाड्यांत जाण्याचे मार्ग वेगळे आहेत, आणि बाहेर पडण्याचे मार्ग वेगळे आहेत. टिकिटें नाहींत. तेव्हां, टिकिटें विकणारे, कापणारे, पहाणारे, आणि घेणारे कशाला हवेत ? ह्या वीजगाडीपासून फायदा होईल, असा अजमास आहे. बेळगांव जिल्ह्यांतील एका बाईच्या मुलाने तिच्या मिठाच्या पडग्यांत पाणी ओतलें ह्मणून तिनें तें मिठाचें पाणी चुलीवर ठेवून मीठ कोरडें क- रून घेतलें, आणि दुसऱ्या एका बाईनें बाजारांतून आणिलेलें मीठ गदळ ह्मणून त्यांत पाणी घालून वर आलेला कचरा काढून टाकिला. ह्याबद्दल पहिलीस १० रुपये व दुसरीस १५ रुपये दंड झाला !! हायकोर्टानें दंड कमी केला आहे, परंतु वर सांगितलेलीं कृत्यें मुंबईच्या मिठाच्या कायद्या- प्रमाणें अपराध आहेत असें ठरविले आहे. आणि मुंबई सरकारचा तो कायदा फारच जुलुमाचा आहे असा शेरा मारिला आहे. आतां पहावें सरकार काय करतें तें. सरकाराकडे हजारों अर्ज गेले पाहिजेत.