पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२७ णाचा दोष येऊं नये, ह्मणून माझें हें मागणें आहे." असे बोलणें चाललें असतां, त्या मंडळीमध्यें, एकाएकी “डामन आला रे डामन आला, " असा एकच शब्द झाला, आणि, हं हं ह्मणतां, डामन हा, पीथियस उभा होता, त्याच्याजवळ जाऊन उभा राहिला. नंतर त्या दोघां मित्रांनीं परस्परांस प्रेमालिंगन दिलें; आणि आपणा- वरचा असत्याचरणाचा कलंक गेला ह्मणून त्या उभयतांस परमसंतोष झाला. तो इतका कीं, त्याविषयीं ते जरी तोंडाबाहेर एक शब्दही काढीत नव्हते, तरी, तो आनंद त्यांच्या चर्यांवर अगदी स्पष्ट दिसत होता. आणखी, हा ह्मणे मी मरेन, तो ह्मणे मी मरेन, असे त्यांचे वाद चा- लले, तेव्हां तर भोंवतालच्या मंडळीच्या मनांत त्यांजवि- षयीं करुणेचा जसा काय पूर आला, आणि राजाला अर्से उघड दिसून आलें कीं, ह्या दोघांतून कोणाच्याही एकाच्या जीवाला जर मीं ढका लाविला, तर, लोक एक- दम माझ्यावर उलटून मला गादीवरून काढून टाकतील कीं काय कोण जाणे. ह्मणून, तो लागलाच उभा रा हिला, आणि सर्व लोकांस ह्मणाला की, "मी ह्या उभयतां गृहस्थांस जीवदान दिलें आहे." तें ऐकून सर्व मंडळीस मोठा संतोष झाला. त्यांनीं राजाचा जयजयकार केला. आणखी राजा स्वतः त्या गृहस्थांच्या मैत्रीनें आणि थोर- पणानें थक्क होऊन, त्या दोघांचा परममित्र झाला. त्याच्या योगानें त्याच्या आचरणांत पुष्कळ फरक पडून तो चांगला झाला. लोक रानटी असोत किंवा विद्याचारसंपन्न असोत, त्यांचे ठायीं सद्गुणाला मान असतो. आणखी दुसरें