पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३६ डामन कोठें दृष्टीस पडेना. लोकांस असे वाटलें कीं, त्यानें पोबारा केला, तो आतां परत येत नाहीं, आणि त्याच्या- बद्दल पीथियस ह्यास खचीत मरावें लागतें. तरी पण, पीथियस तिळमात्रही डगमगला नाहीं. कां कीं, त्याची खातरी अशी होती कीं, डामन हा एक मेला तर, किंवा तशाच कांहीं अनिवार्य संकटांत अडकला तर मात्र याव- याचा नाहीं – एरव्हीं तो यावयास कधीं चुकावयाचा नाहीं. आणखी तो ह्मणे कीं, असें जर त्याचें कांहीं झालें असलें, तर मी मरायास तयार आहें. शेवटीं फांशी देण्याची वेळ अगदी जवळ येऊन ठे- पली. पीथियस ह्यास फांसाजवळ नेलें; राजा तेथें आला; हजारों लोक त्याच्या सभोंवतीं जमले; आणखी, डान ह्याचा कावेबाजपणा व पीथियस ह्याचा दृढनिश्चय ह्यांवि- पयीं त्यांमध्यें पुष्कळ चर्चा चालून, पीथियसाविषयीं अति- शयित कळवळा उत्पन्न झाला. ते त्याविषयीं फार हळहळू लागले. स्वतः राजाच्या मनालाही फार वाईट वाटलें. परंतु, पुनः त्याच्या मनांत असें आलें कीं, अपराधी मनु- प्यास बचावण्याकरितां आणि आपणास फसविण्याकरितां हा कावा ज्या पक्षी झाला आहे, त्या पक्षी, कराराप्रमाणें,. पीथियस ह्यास फांशीं दिलेंच पाहिजे. झालें. पीथियस ह्यास फांशींच्या खांबावर उभे केलें. तरी, त्यानें हूं का चूं केलें नाहीं. तथापि त्यानें जव- ळच्या लोकांस वारंवार एवढेच सांगावें कीं, “कायद्याप्र- माणें जितका अवकाश होण्यासारखा असेल, तितका होऊं द्या; तो माझ्याकरितां नको; मी मरायास एका पायावर तयार आहें; पण, माझा मित्र डामन ह्यावर असल्याचर-