पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०


पंधरा मण भात देण्याचा ठराव केला. आणखी फिरंगी जातीच्या लोकांस कधीं बेगार सांगूं नये, असा हुकूम देऊन ठेविला.

हा किल्ला चिमाजी आपांनी हस्तगत केला, तेव्हां त्याच्या खालचा नऊ लाखांचा मुलूख त्यांच्या स्वाधीन झाला. ही स्वारी अशी सफल झाल्याच्या योगानें मराठ्यांस मोठा संतोष झाला. त्या स्वारीमध्यें जे शिपाई पतन पावले होते, त्यांच्या कुटुंबांस पेनशनें दिलीं. आणि वसईच्या सुभ्याचें काम शंकराजी केशव फडके ह्यांस सांगून, चिमाजी आपांची स्वारी परत पुण्यास आली. ह्रीं वर्तमानें इ० स० १७३९ त घडलीं.

स्फुट.

सत्यवक्ता कवि. – साराक्यूजचा राजा डायओनिसियस हा मोठा जुलुमी होता. त्याला कविता करण्याचा छंद असे. त्या कविता अगदी वाईट होत असत; तरी, तो त्या आपणच आपल्या चाकर लोकांस गाऊन दाखवी, आणि ते त्याला, तोंडपुजेपणा करून, कालिदासापेक्षाही उत्तम ह्मणून त्याची स्तुति करीत. त्या सेवकांमध्यें फिलोक्षेनिस ह्मणून एक गृहस्थ होता. तो मोठा रसिक असून कविता फार चांगल्या करीत असे. तो मात्र त्या राजाच्या कविता ऐकून नाक मुरडीत असे; आणि राजानें त्याचें मत विचारलें ह्मणजे तो साफ असें ह्मणे कीं, “त्यांत कांहीं अर्थ नाहीं." असें पांचचार वेळ ऐकून घेतल्यावर, अतिशय संतापून, त्या राजानें फिलोक्षेनिस ह्यास साराक्यूज येथील बंदिशाळेंत टाकिलें, आणि तेथें त्याचा