पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३५ 1मा१० लक्षावधि वर्षे, ज्या प्रभूनें लीलामात्रें करून चालविलें आहे, त्याच्या चरणीं अनन्यभावें निरंतर वंदन असो. राजाला प्रजेसारखें व्हावें लागतें. सिसिलि बेटांतल्या सायराक्यूज संस्थानामध्यें प्राचीन काळी डायओनिशियस हा जुलमी राजा राज्य करीत होता, तेव्हां लोकांमध्यें स्वातंत्र्य आणि स्वदेशाभिमान ह्यांचें वारें पुष्कळ शिरलें होतें. आणखी, त्याच्या पायीं, पुष्कळ चां- गल्या माणसांच्या प्राणांशीं गांठी पडल्या. त्या प्रकारच्या मं- डळींत दोन गृहस्थ होते. ते जिवलग मित्र होते. त्यांतल्या एकाचें नांव डामन होतें, आणि दुसऱ्याचें नांव पीथियस होतें. त्यांचें आचरण अत्यंत शुद्ध होतें; आणि लोकांत त्यांची मानमान्यता मोठी होती. त्यांतल्या, डामन ह्या गृहस्थाविषयीं राजाच्या मनांत संशय उत्पन्न झाला; आणि त्यास जिवें मारण्याची शिक्षा त्यानें ठरविली. तीस तो मान्य झाला. तरी, त्यानें राजापाशीं एवढीच प्रार्थना केली कीं, मला एका जवळच्या गांवीं जाऊन तेथल्या ज मीनजुमल्याची व्यवस्था करण्यास परवानगी मिळावी. आणि पीथियस ह्यानें आपण होऊन राजास असें ह्मटलें कीं, ह्या माझ्या मित्रास आपण कृपा करून त्याच्या कामाकरितां जाऊं द्यावें, त्याच्या मोबदला मी तुरुंगांत राहातों, आणि फांशीं देण्याच्या नेमल्या वेळेस तो जर परत न आला, तर मी स्वसंतोषानें त्याच्याबद्दल मरेन. ती गोष्ट त्या रा जानें कबूल केली; आणि डामन हा त्या गांवास नि- घून गेला. इकडे फांशी देण्याची वेळ जवळ येत चालली, तरी