पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३४ असा येतो; तसाच पुढें र य, य न, व न स असा येतो. ह्याला अगदी व्यवहारांतलें उदाहरण ह्मटलें ह्मणजे गोफण- गुंड्याचें किंवा तेलाच्या घाण्याच्या बैलाचें होय. गोफणीं- तल्या गोट्याची मूळची जाण्याची दिशा सरळ असते, परंतु गोफणीच्या आकर्षणामुळें तो वाटोळा फिरतो; आणि घा- ण्याच्या बैलाच्या मनांत सरळ जावयाचें असतें, परंतु मधल्या दांड्यामुळे तो वाटोळा फिरतो. मनुष्य मध्यें उभा राहून आपल्याभोंवतीं घोड्यास धांवडवीत असतो, तेंही उदाहरण चांगले आहे. ग्रहांच्या कक्षांच्या वक्रतेची मूळपीठिका हीच होय. ह्या पीठिकेवरून सर्व ग्रहांच्या आणि उप- ग्रहांच्या कक्षांचें मान अगदी बरोबर बसलें आहे. आणि तें अगदी बरोबर आहे, असें ग्रहणादिकांच्या फलांवरून अनुभवास आलें आहे. ● पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा जोर तिच्या पृष्ठभागावर च्या सर्वच ठिकाणीं सारखा नाहीं. याचें कारण पृथ्वीची आकृति आणि तिच्या आंसावरची तिची गति होय. पृथ्वी आपल्या ध्रुवांच्या बाजूंस चपटी असल्यामुळे तिच्या ध्रुवांजवळच्या जागा, मध्यरेषेवरच्या जागांपेक्षां केंद्रास अधिक जवळ आहेत; ह्यामुळे ध्रुवांजवळची गुरुत्वाकर्षण- शक्ति, मध्यरेषेवरच्या गुरुत्वाकर्षणशक्तीपेक्षां ११२ इतकी जास्त आहे, असे प्रयोगांवरून सिद्ध झाले आहे. कोण- ताही एक पदार्थ ध्रुवांजवळच्या प्रदेशांत मध्यरेषेजवळच्या प्रदेशांपेक्षा जास्त जड भरतो. गुरुत्वाकर्षणासारखे विलक्षण धर्म पदार्थांच्या ठायीं निर्माण करून हें एवढें विश्व अगदी बरोबर रीतीनें, आज