पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३३ हातानें खालीं लोटलेला गोळा जेव्हां ट ह्या ठिकाणी पोंचेल, तेव्हां तोफेनें सोडलेला गोळा न ह्या ठिकाणीं पोंचेल; आणि येणेंप्रमाणें ते दोन्ही गोळे खवप ह्या ठिकाणी एकाच वेळीं येऊन पोंचतील. ह्मणजे, ह्या दोन गोळ्यांच्या पतनमार्गीत मात्र भेद आहे. हातानें लोटून दिलेल्या गोळ्याचा पतनमार्ग नीट सरळ उभा आहे, आणि तोफेंतून उडविलेल्या गोळ्याचा पतनमार्ग बांकदार, वक्र आहे. हा असा वक्र होण्याचें कारण, दोन प्रकारच्या गतींच्या संगमाचा परिणाम होय. ह्मणजे, त्या गोळ्यास नीट समोर पुढे जाण्याची गति तोफेनें दिलेली असते, आणि त्यांत पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणानें, खालीं पडण्याची दुसरी एक गति उत्पन्न झालेली असते; तेव्हां, त्या दोन्ही गतींच्या मार्गीस सोडून, तो गोळा, त्यांच्या मधल्या मार्गानें वांकडा वांकडा जातो. सूर्याभोंवतीं जे ग्रह फिरत आहेत, त्यांच्या कक्षा वर्तुलाकार होण्यास कारण हेंच आहे. तें कसें तें पहाः-क हा सूर्य आहे, आणि ख हा एक ग्रह, ख ग म त य 5.1 नीट प कडे जायास पाहातो; पण त्यावर सूर्याचें आकर्षण झाल्यामुळें, तो त्या दोन्ही गतींच्या मधल्या मार्गानें, ख र