पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३२ ह्यावर उत्तर असे आहे कीं, कागदाचा पृष्ठभाग फार मोठा असल्याच्या योगानें त्याला खालीं पडतांना हवेचा फार प्रतिबंध होतो, ह्मणून त्याला उशीर लागतो. एका कापसाच्या पुंजक्याला कथिलाच्या बेगडीचा लहानसा तु- कडा अडकवून तें सगळें उंचावरून खालीं टाकावें, ह्म- णजे त्याला खालीं पोंचायाला बराच वेळ लागतो, परंतु त्याच बेगडींत तो कापूस घालून त्याची गोळी केली, तर ती चटकर खालीं पडते. ह्या आकर्षणशक्तीच्या योगानें ही जी पतनगति पदा- र्थास प्राप्त होते, ती, त्याचेठायीं दुसरी गति आली अ- सली तरी, तशीच अचल चालू राहाते. कल्पना करा कीं, कम हा एक बुरूज आहे, त्याचें शिखर क प. म हें आहे, तेथून एक गोळा सरळ खाली जमिनीकडे सो डिला, आणि दुसरा गोळा, तोर्फेत घालून समोर, मोठ्या वेगानें फेंकला; तरी ते गोळे एकाच वेळी जमिनीवर येऊन पोंचतील. खालीं सोडलेला गोळा जेव्हां ग ह्या ठिकाणी पोंचेल, तेव्हांच, तोफेनें सोडलेला गोळा, कक्षा दाखविली आहे तींतून, य ह्या ठिकाणीं पोंचेल; आणि