Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३० तर, तो शंभरांच्या चतुर्थांशाइतका, ह्मणजे पंचवीस शेर भरेल. तोच जर चंद्राच्या अंतराइतका, ह्मणजे पृथ्वीपासून दोन लक्ष चाळीस हजार मैलांवर नेला, तर तेथें-ह्मणजे केंद्रापासून पृष्ठभागापर्यंत जें अंतर आहे, त्याच्या साठपट जर दूर नेला तर तेथें - त्याचें वजन, साठांचा वर्ग छत्तीसशें, ह्यांनीं शंभरास भागल्याइतके शेर- ह्मणजे ३६ शेर-ह्मणजे. एका तोळ्याहून थोडें अधिक एवढे मात्र भरेल ! - एकाद्या उंच ठिकाणाहून पदार्थ सुटून पृथ्वीवर पडा- यास लागला, ह्मणजे त्यावर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा अधिकार अधिकाधिक बसत जाऊन, तो अधिकाधिक वे गानें खालीं पडत जातो. त्याचें प्रमाण असें:- तो पहिल्या सेकंदांत जितका चालतो, त्याच्या तिप्पट दुसऱ्या सेकं- दांत चालतो, तिसन्या सेकंदांत पहिल्या सेकंदाच्या पांच- पट चालतो, चवथ्या सेकंदांत पहिल्याच्या सातपट चालतो, इत्यादि. ह्यावरून हें लक्षांत येण्यासारखें आहे कीं, पदार्थ खालीं किती वेळांत पडला तें पाहावें, त्या वेळाचे कांहीं सारखे भाग करावे, मग पळें करा की मिनिटें करा- आणखी मग असे समजावें कीं, तो पदार्थ पहिल्या भागांत जितकें अंतर चालला, त्याच्या तिप्पट अंतर दुसऱ्या भागांत चालला आहे, तिसऱ्या भागांत पहिल्या भागांतल्या अंतराच्या पांचपट चालला आहे, चवथ्यांत पहिल्याच्या सातपट चालला आहे, इत्यादि; ह्मणजे, कितवें पळ किंवा कितवा सेकंद आहे तें पाहून, त्याच्या अनुक्रमसंख्येस, क्रमानें एक, तीन, पांच, सात, नऊ, अकरा, तेरा, इत्या- दिकांतली जी संख्या बसेल, तिनें, पहिल्या पळांतल्या किंवा सेकंदांतल्या गतीस गुणावें, ह्मणजे त्या भागांत तो किती