पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२९ गोष्टींत अगदी स्पष्ट दिसून येतें. एकाद्या लहानशा ड- बक्यांत काडी टाकावी; ती लागलीच त्याच्या कडेला ये- ऊन लागते; अथवा त्यांत कांहीं कारणानें बुडबुडे उत्पन्न झाले, तर, तेही त्याच्या कडेस येऊन बसतात. ह्याचें कारण असे की, त्या काडींतल्या आणि त्या वुडबुड्यां- तल्या प्रकृत्यंशांपेक्षां कडेच्या मातीचे प्रकृत्यंश अधिक असतात. आणि, काडी व आणि, काडी व बुडबुडे हे पाण्यावर तरंगत असून, त्यांस घर्षणाचा प्रतिबंध मुळींच नसल्यामुळे, ते दोन्ही पदार्थ, गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणें, कडेच्या पुष्कळ प्रकृत्यंशांकडे आपोआप ओढले जातात. पृथ्वीतल्या सर्व कणांची आकर्षणशक्ति एकवटून, तिचा सगळा ओढा पृथ्वीच्या केंद्राकडे ह्मणजे तिच्या पोटांतल्या मध्यबिंदूकडे वळलेला आहे. ह्मणून पृथ्वी- वरचा निराधार पदार्थ त्याकडे जायाचा प्रयत्न करीत अ- सतो. आणि ह्मणून, पदार्थ पृथ्वीच्या केंद्राच्या जितका जवळ जवळ जातो, तितकें तितकें त्याचें वजन वाढतें, आणि तो त्यापासून ज्या मानानें दूर दूर जातो, त्या मानानें तें कमी कमी होतें. हेंच शास्त्रीय भाषेनें असें बोलतात कीं, अंतराचा वर्ग वाढत जातो, त्या प्रमाणानें आकर्षणशक्ति कमी कमी होत जाते. पृथ्वीचा व्यास आठ हजार मैल आहे; ह्मणजे, तिच्या केंद्रापासून पृष्ठभागापर्यंत अंतर चार हजार मैल आहे. आतां, पृथ्वीच्या पृष्ठभागावर एका पदार्थाचें वजन शंभर शेर भरत आहे, असे समजा. पदार्थ जर केंद्रापासून दुप्पट हा अंतरावर - ह्मणजे पृ- - थ्वीच्या पृष्ठभागापासून चार हजार मैलांवर किंवा केंद्रा- पासून आठ हजार मैलांवर नेऊन वजन करून पाहिला, २०