Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२८ सुटलें तेव्हां ह्यास जाण्यास दाही दिशा मोकळ्या असून, हें खाली पृथ्वीवरच कां पडलें ? आजूबाजूस किंवा वर अ वकाश रिकामा असून तिकडे कोठें कां नाहीं गेलें ? ह्या विचारांत त्यानें सुमारें सत्रा वर्षे घालविलीं; आणि अनेक प्रकारचे प्रयोग करून पाहून, आणि आकाशांतील ग्रहांच्या गतींकडे लक्ष पुरवून एक सिद्धांत बसविला. तो हाः- “सृष्टींतल्या प्रत्येक पदार्थाचें आकर्षण दुसऱ्या प्रत्येक पदार्थावर निरंतर घडत असतें, व त्याचा जोर त्या थतल्या प्रकृत्यंशांप्रमाणें कमजास्त असतो; आणि तो त्या पदार्थीमधल्या अंतराच्या वर्गाप्रमाणें कमी होत जातो. "" पदा- 6 हा नियम चांगला लक्षांत येण्यास कांहीं उदाहरणें दिलीं पाहिजेत. त्यास आधीं प्रथम प्रकृत्यंश ह्मणजे काय तें कळले पाहिजे. प्रकृत्यंश ह्मणजे, पदार्थीतला असा कण कीं, त्याचा भाग होऊं नये, त्याचे तुकडे क रतां येऊं नयेत, आणि त्याच्यामध्यें इतर कणांचा समा- वेश होऊं नये. हे प्रकृत्यंश वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पदार्थात वेगळ्या वेगळ्या मानानें असतात. एक घन इंच रबराचा तुकडा, ह्यांतले प्रकृत्यंश, एक घन इंच लोखंडाच्या तुकड्यांतल्या प्रकृत्यंशांपेक्षां पुष्कळ कमी अ- सतात. हें केवळ त्यांच्या वजनावरून कळण्यासारखें असतें. बोरूंतले परमाणु एकमेकांपासून दूर दूर अघ- ळपघळ बसलेले असतात, सागाच्या लांकडांतले परमाणु खचून बसलेले असतात, आणि सोन्यांतले परमाणु त्यांहू- नही अधिक खचून भरलेले असतात. परमाणूलाच आह्मी प्रकृत्यंश ह्मणतों. आतां, परमाणूंचें आकर्षण कसें होतें तें कितीएक ●