पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२७ जेन ग्रे अशीं मोठीं कीर्तिमान व्हावयाचीं नाहींत. परंतु ज्या आकाशांत गरुड, भारद्वाज, कोकिल इत्यादि पक्षी उड्डाण करितात, त्याच आकाशामध्यें, चिमण्या, पोपट आणि लहान लहान माशा उडत असतात. हें लक्षांत ठेवून, कालदेशवर्तमान पाहून स्वशक्त्यनुसार प्रयत्न क रावयाचा. हेंच कर्तव्य होय. गुरुत्वाकर्षण. गुरुत्व ह्मणजे मोठेपण, आणि आकर्षण ह्मणजे ओढणें, मिळून गुरुत्वाकर्षण हा शब्द झाला आहे. हें गुरुत्वा कर्षण प्रत्येक पदार्थाचे ठायीं निरंतर विद्यमान असतें. पदार्थोंतला प्रत्येक परमाणु, मग तो लहान असो की मोठा असो, आपल्या सामर्थ्यानुरूप, आपल्या भोंवतालच्या सर्व लहानमोठ्या परमाणूंस आपणाकडे ओढीत असतो. हाच प्रकार सर्व लहानमोठ्या पदार्थीस लागू आहे. ह्या सि- द्धांताची साधारण कल्पना आपल्या पूर्वजांस होती, हें खरें आहे; परंतु त्याला विशेष स्वरूप देऊन, त्याची क ल्पना पक्कदशेस आणण्याचें श्रेय इंग्लंडांतला नामांकित तत्त्ववेत्ता सर ऐझाक न्यूटन ह्यास मिळाले. त्याचें लक्ष ह्या गोष्टीकडे वळण्यास एक फारच क्षुल्लक गोष्ट कारण झाली. ती अशी:- - तो सुमारें चोव्वीस वर्षांचा असतां, इ० स० १६६६ ह्या वर्षी एके दिवशीं बागांत सहज बसला असतां, झा- डावरचें एक फळ तुटून खाली जमिनीवर पडतांना त्याच्या दृष्टीस पडलें. त्यानें त्याचें चित्त वेधिलें, आणि त्याच्या मनांत असा विचार उत्पन्न झाला कीं, हें फळ देंटापासून