पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२६ ह्मणूनच वामनपंडितांनीं ह्मटलें आहे:- विपत्कालीं धैर्य प्रभुपणि सहिष्णुत्व बरवें सभे पांडित्याचा प्रसर समरीं शौर्य मिरवे स्वकीर्तीच्या ठायीं प्रचुर रति विद्याव्यसन जे तयांचे हे स्वाभाविक गुण सहा सत्पुरुष जे. ह्मणजे, सत्पुरुषांचे जे मोठे साहा गुण सांगितले आ- हेत, त्यांत विपत्कालीं धैर्य धरणें हा गुण प्रथम वर्णिला आहे; कां कीं तो इतरांपेक्षां श्रेष्ठ आहे. ह्यावरून एवढेंच समजावयाचें कीं, खरी थोर माणसें जीं आहेत, त्यांस प्रभुपण येवो किंवा विपत्काल येवो, त्यांच्या हातून अशीं कामें व्हावयाचीं कीं त्यांवरून त्यांची सत्कीर्तीच व्हावी. आणि हे सगळें फळ निश्च- याचें आहे. हा नियम केवळ व्यक्तींस लागू आहे, असें नाहीं; राष्ट्रांसही तसाच लागू आहे. आपल्या महारा- ष्ट्राचा सतराव्या शतकांतला इतिहास, आणि स्पार्टा, अथेन्स इत्यादि प्राचीन राष्ट्रांचे इतिहास पाहिले असतांही अ- सेंच " विपत्कालीं धैर्य " दिसून येतें. अशीं माणसें आणि अशीं राष्ट्र खरोखर धन्य होत. प्रभुत्व आलें तरी तें नश्वर असतें, आणि विपत्काल आला तरी तो नश्वर असतो, चिरस्थायी असें कांहींच नसतें; मग, कोणतीही स्थिति प्राप्त झाली असतां, मागें कीर्ति राहील, असेंच कां न वागावें संकट येऊं नये, आणि आलें असतां त्याचें निवारण व्हावें, अशी परमेश्वरप्रार्थना करीत असावें. पण, जर संकट आलें, तर, त्यांत धैर्य धरून वेळ निभा- वून नेणें, हेंच भूषण आहे. हे साधेल तितकें साधावें. सगळींच माणसें दशरथ, रामचंद्र, धर्मराज, भीमसेन, लेडी -