पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९


ठ्यांच्या लष्करास कळविली. तेणेंकरून, सुरुंग लावून किल्ला सर करण्याची दिशा चिमाजी आपांस चांगली कळली. त्याप्रमाणें उद्योग केल्यावर कांहीं वेळानें फिरंगी जेरीस आला. त्याची बायको, भयभीत होऊन, जाहजांत बसून, बाहेर निघाली. ती पेशव्यांचे लष्करी लोकांनीं धरून चिमाजी आपांकडे नेली. ती फार सुस्वरूप होती. तिकडे पाहून, ते ह्मणाले "अरे, ही कशाला धरून आणिली ? " नंतर, तिला साडीचोळी देऊन, मोठ्या आदरानें, तिची परत रवानगी करून दिली. ती परत किल्ल्यांत जाऊन आपल्या नवऱ्यास ह्मणाली, "तुझी चिमाजी आपाशीं कशासाठी भांडतां ? तो पुण्यवान आहे. मी तेथें गेलें असतां, त्यानें मला वांकडे दृष्टीने पाहिलें देखील नाहीं; आणि साडी चोळी देऊन आदरमानानें परत लावलें. त्याशी लढून तुह्मांला यश यावयाचें नाहीं." तें त्यास खरें वाटलें. आणि त्यानें आपला माणूस चिमाजी आपांकडे पाठवून त्यापाशीं बोलणें लाविलें कीं, “आमचे पदरीं कारकून आहेत, त्यांचा सांभाळ आपण करावा, आमची जात आहे, तिला कोणत्याही प्रकारची बेगार सांगूं नये; आणि आह्मांस आठ दिवसांची मुदत द्यावी; ह्मणजे तेवढ्या वेळांत आह्मी सगळा किल्ला खालीं करून तुमच्या हवालीं करितों." तें बोलणें चिमाजी आपांनीं मान्य केलें. आणि त्याप्रमाणें व्यवस्था झाली. ह्मणजे, फिरंगी त्या किल्ल्यांतलें आपलें सामानसुमान घेऊन निघून गेला; चिमाजी आपा आंत गेले; त्यांनीं तेथें भगवे झेंडे उभारून आपला अमल बसविला; आणि तेथल्या कारकुनांस दरसाल छत्तीस छत्तीस रुपये आणि पंधरा