पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२५ दृष्टीस पडली. तिला त्यानें विचारिलें, “आपण नाहीं बागांत खेळायास गेलां ? " त्यावर तिनें असें उत्तर दिलें कीं, " मला प्लेटोच्या ग्रंथाच्या अवलोकनानें जो आनंद होत आहे, त्याच्यापुढें बागेंतल्या खेळाचा आनंद कांहींच नाहीं. खरा आनंद ह्मणजे काय, हें मंडळीला कळत नाहीं. काय करावें !" एवढी मार्मिक आणि गुणवान लेडी ग्रे होती. आणखी तिला इंग्लंडची गादी मिळण्याचाही योग आला होता. परंतु, राज्यकारस्थानांत गडबड होऊन, सगळें पारडें बदललें, आणि तिला व तिच्या नवऱ्याला देहान्त शासने द्यावयाचीं ठरलीं. तरी, तितक्यांत, मेरी राणीनें तिला असे सांगून पाठविलें कीं, तुझी जर प्राटे- स्टंट पंथ सोडून देऊन, रोमन क्याथोलिक पंथाचा स्वी कार कराल, तर, आह्मी तुह्मांला जीवदान देऊन प्रति- बंधमुक्त करूं. तीस तिनें, तिळभरही न ढळतां, साफ नाहीं ह्मणून सांगितलें ! आणखी, तिच्या नवऱ्याचा शि- रच्छेद केल्यावर त्याचें प्रेत जरी तिच्या पुढून नेलें, तरी ती घाबरली नाहीं. एवढेंच केवळ नव्हे; तर ती शिर- च्छेदस्तंभावर चढली तेव्हां, शांतपणें, शिरच्छेदकास वि नयपूर्वक ह्मणाली, महाराज, कृपा करून माझी सुटका लवकर करा. " आणखी अगदीं घाव पडतेवेळेस बो- लली, " परमेश्वरा, मी हा आपला आत्मा तुझ्या स्वाधीन करतें; ह्याचा सांभाळ तूं कर." हा प्रकार घडला, तेव्हां ती अवघी अठरा वर्षांची होती. हिचा लौकिक हिच्या इतर सद्गुणांवरून तर पुष्कळ आहेच; परंतु, तिनें शेव- टच्या भयंकर प्रसंगी जें विलक्षण धैर्य प्रगट केलें, त्याव- रून तिचें नांव विशेष अभिनंदनीय झालें आहे. 66