पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२४ जरी क्रोध नावरे तुझिया चित्ता, तरी गदा ओपीं गा माझिया माथा, परी असत्य तें कुंतिसुता, स्पर्शे ऐसें न करावें. मुक्तेश्वर. असें धर्मराजानें ह्मटलें, आणि शांतवृत्ति प्रगट केली; आणि- - जी ही गदा मम करांत सदैव नाचे घातें इच्या चुरिन ऊरु सुयोधनाचे रक्ते तयांतिल विलेपिन मी स्वपाणी त्यांहींच बांधिन सखे तव मुक्त वेणी. परशुरामपंत गोडबोले. अशी प्रतिज्ञा भीमानें करून शेवटास नेली; ह्यांतलें कां- हींएक झालें नसतें. तशीच इंग्लंडामध्यें लेडी जेन ग्रे ह्या नांवाची एक त- रुण स्त्री सोळाव्या शतकांत होऊन गेली. ती, इंग्लंडाचा राजा आठवा हेनरी ह्याच्या बहिणीची नात होती. ती चांगली शिकलेली होती. तिला फ्रेंच, ल्याटिन आणि ग्रीक ह्या भाषा उत्तम येत असत. विणण्यातुणण्याचें न कशीचें काम ती फार चांगलें करीत असे. शिवाय ती मोठी विद्याभिलाषी होती. एके दिवशीं, इलिझाबेथ रा- णीचा गुरु गेजर आश्चाम हा तिच्या बापाच्या येथें रहा- यास आला होता; तेव्हां, सगळी मंडळी, बागेमध्यें नाना- प्रकारच्या खेळांत गुंतली असतां, ही मुलगी, तेव्हां केवळ चौदा वर्षांची होती, ती एका खोलीमध्यें, एकटी, प्लेटो ह्या ग्रीक तत्त्ववेत्त्याचा एक ग्रंथ वाचीत बसलेली त्याच्या