Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

को. टिळक प्रवाई. २२३ सदा देव देवो तुझांला यशाला करावें तुझीं साह्य आह्मां जनांला अशी प्रार्थना ही करोनी तुह्मांतें करीतों पुन्हा एकदां वंदनातें. ८. संकट आणि कीर्ति. जनाच्या व्यवहाराचा विचार केला ह्मणजे असें दिसतें कीं, मोठी कीर्ति जी आहे, ती संकटावांचून प्राप्त होत नाहीं. किंबहुना, संकट हें कीर्तीचें बीज आहे, असें वा- टतें. आणखी ह्यावरून असें ह्मणावें लागतें कीं, ज्या मा- णसांची कीर्ति ह्या जगावर झाली नाहीं, त्यांचे ठायीं कीर्ति होण्यासारखे गुण नव्हते असें नव्हे, तर, त्या गुणांस क- सोटीस लावण्यासारखीं संकटें त्यांस प्राप्त झालीं नाहींत. कैकेयीनें रामास वनवासास पाठविण्याचा वर जर द शरथापाशीं मागितला नसता, तर, वाचेनें दिलेलें अभि- वचन खरें करण्यास केवढेही कष्ट पडले तरी सोसावयाचे, हा जो त्याचा निश्चय होता, तो कधींही बाहेर पडला न- सता; आणि त्यावरून त्यास कीर्ति मिळाली नसती. त्या- प्रमाणेंच, रामचंद्राची पितृभक्ति आणि राज्याविषयीं नि- र्लोभिता, आणि भरताची बंधुप्रीति, हे गुणही त्याच प्रसं- गानें प्रगट होऊन त्यांचा महिमा वाढला आहे. कौरवांनीं अत्यंत दुष्टपणानें सभेमध्यें द्रौपदीची जी विटंबना केली, ती जर मुळींच केली नसती, तर, धर्मरा- जाची अप्रतिम शांतवृत्ति, आणि भीमसेनाची अप्रतिम तेज- स्विता, ह्या कधींही प्रगट झाल्या नसत्या, आणि त्यांवरून त्यांस एवढी कीर्ति मिळाली नसती. आणि