Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२२ करावें तुह्मां वंदना भक्तिभावें यशा तूमच्या निर्मला नित्य गावें. अनंतीं युगीं फार मागील काली अनंतें मनुष्यें क्रियाहीं जहालीं तयां जाणणें हें सुदुःसाध्य होतें तुझीं साध्य केलें स्वकर्मे अहो तें. अहा राम कोठें तसा कृष्ण कोठें कुठें बौद्ध तो वाटतें चोज मोठें तयांचीं जनां दर्शनें व्हावयासी तुझीं निर्मिला मार्ग सोपा प्रयासीं. कथी व्यास आह्मां स्वयें भारतातें तसें दाविती योध युद्धक्रियांतें गुरू ऐकवी भाषणातें स्ववाचे असे भोग घेतों नवांही रसांचे. जनां या जगीं काय जें सौख्य होतें कृतींनी खरें तूमच्या की अहो तें पुढे राहिलें काय सांगावयाचें न वाटो अलंकार हा व्यर्थ वाचे. तयांनीं झडे पापसंताप सारा मनातें मिळे ज्ञानसौख्यांत थारा क्षमा शांति वैराग्य इत्यादि येती स्वयें तीं लया दुःखशोकास नेती. स्वता ईश्वराला खरें ओळखाया तसा स्वर्गलोकाप्रती नीट जाया तुझीं दाविला मार्ग साधा जनातें करावें किती तूमच्या गौरवातें. १. २. ३. ४. ६.