Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२१ गणना आहे. पारशी लोकांच्या स्मशानांतल्या मारामा- रीच्या संबंधानें जो एक मोठा खटला बरेच वर्षांमागें चा- लला होता, त्यांत एका पक्षाचे व्यारिस्टर फेरोजशाहा होते, आणि प्रतिपक्षाचे ब्यारिस्टर, नामांकित वक्ते आ- नस्टी हे होते. त्या वेळी आनस्टी साहेबांनीं फेरोजशा- हांची फार तारीफ केली. आनस्टीसारख्या मनुष्याच्या मुखानें शाबासकी मिळविणें हें साधारण मनुष्यास साधा- वयाचें नाहीं. - राष्ट्रीय सभेविषयीं कांहीं पारशी गृहस्थांचें मत विरुद्ध होतें; आणि त्यावरून कांहीं अडचण उत्पन्न होईल, असें भय पडलें होतें. परंतु, तें भय नाहींसें झालें आहे. आ णखी तें नाहींसें करण्याचें पुष्कळ यश - किंबहुना बहु- तेक यश - फेरोजशाहांचें आहे. आह्मांस फार संतोष वा- टतो कीं, गेल्या महिन्याच्या अखेरीस राष्ट्रीय सभा कलक- त्यास भरली होती, तिचे अध्यक्ष हेच गृहस्थ होते. आणखी ह्यांनीं आपलें काम उत्तम प्रकारें केलें, असें सर्वतोमुखीं झालें आहे. फेरोजशाहांस सार्वजनिक कामांत आणि स्वतःच्या उद्योगांत असेंच निरंतर यश येवो, आणि त्यांचें आयुष्य सुखानें जाऊन त्यांचे हातून आमच्या राष्ट्राचें कल्याण होवो, असें परमेश्वरापाशीं मागून आह्मी हें चरित्र समाप्त करितों. ग्रंथकारांस वंदन. श्लोक. अहो ग्रंथकर्ते तुझी थोर साचे खरें साधितां की हिता माणसांचे •