पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२० पासून आहे. हे विलायतेस होते, तेव्हां देखील तिक- डच्या सार्वजनिक संस्थांची माहिती करून घेत असत, आणि आन. दादाभाई नौरोजी ह्यांस सार्वजनिक कामांत साह्य करीत असत. विलायतेस ईस्ट इंडियन असोसि- एशन ह्मणून जी एक सभा आहे, तिची स्थापना कर- ण्याच्या कामांत ह्यांचे उद्योग पुष्कळ उपयोगी पडले आहेत. हे गृहस्थ मुंबईच्या प्रेसिडेन्सी असोसिएशनाचे प्रमुख सभासद आहेत. एकनिष्ठतेविषयीं ह्यांची मोठी आख्या आहे. आणि जें काम हे हातीं घेतात, तें शेवटास नेल्याशिवाय सोडीत नाहींत, असा ह्यांचा लौकिक आहे. हे इ० स० १८८७ पासून इ० स० १८८९ पर्यंत मुंब- ईच्या कायदेकौंसलाचे सभासद होते. तेथेंही त्यांनीं आपले काम अत्यंत निस्पृहतेनें आणि मोठ्या आस्थेनें केलें. तसेंच, आज पुष्कळ वर्षेपर्यंत ते मुंबईच्या म्यु निसिपल कार्पोरेशनचे सभासद आहेत. त्यांत देखील त्यांची स्वातंत्र्यप्रीति आणि लोकहिताविषयींची आस्था उत्तम प्रकारें प्रगट झाली आहे. सरकारानें त्यांस इ० स० १८६७ या वर्षी मुंबईच्या युनिव्हर्सिटीचे फेलो नेमिलें. आणि एकंदर सगळ्या परीक्षापद्धतीची बारीक चौकशी करण्याचा जो ठराव नुकताच युनिव्हर्सिटीच्या सेनेट- मध्यें झाला आहे, त्याचें श्रेय मि. फेरोजशाहा ह्यांजकडे आहे. इ० स० १८८९ सालच्या येथल्या राष्ट्रीय स भेच्या स्वागतमंडळाचे हे अध्यक्ष होते. आणखी त्यांनीं त्या प्रसंगी जें भाषण केलें, तें अत्यंत चित्तवेधक होतें. मुंबईतल्या उत्तम ब्यारिस्टरांत फेरोजशाहा ह्यांची ०