पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८


चिमाजी आपांनीं वसई कशी घेतली ?

 बाजीराव बल्लाळ पेशवे गादीवर होते, तेव्हां मराठ्यांच्या राज्याची मोठी चलती होती. तीस कारण त्या कारकीर्दीतले सरदार होते. त्यांत प्रमुख चिमाजी आपा होते. त्यांचे मनांत असें आलें कीं, फिरंग्यापासून वसई घ्यावी. तिकडे ते सैन्यासहवर्तमान गेले. परंतु, तेथचा किल्ला समुद्रांत असल्यामुळे, आणि त्यांजपाशीं जहाजें नसल्यामुळे त्यांचा उपाय चालेना. ह्मणून, आधीं त्यांनीं जहाजें तयार केलीं, आणि त्या किल्ल्याला वेढा घातला. त्यास आंतल्या लोकांनीं तीन वर्षेपर्यंत दाद दिली नाहीं. चिमाजी आपांनीं मोठमोठे हल्ले केले, तरी कांहीं उपयोग होईना. तेव्हां, सगळ्या सरदार लोकांस जमा करून चिमाजी आपा त्यांस मोठ्या त्वेषानें ह्मणाले कीं, “किल्ला हस्तगत होत नाहीं, ह्याकरितां मजला तोफेचे तोंडी बांधून माझें डोकें तरी किल्ल्यांत पाडावें; नाहीं तर किल्ला घ्यावा." त्यांस सरदार ह्मणाले, “जो आपला निश्चय झाला, तोच नेम आमचा आहे. पण, किल्ल्यातील भेद समजल्याशिवाय किल्ला हस्तगत होणें कठिण. "

 त्याप्रमाणें किल्ल्यांतली खबरबखर बाहेर आणण्याकरितां, खंडोजी माणकर हे गुराख्याचें सोंग घेऊन किल्लयांत गेले; आणि रोजच्यारोज लोकांचीं गुरे चारूं लागले. दुसरे अंजुरकर पांचकळशे सुतार होते, ते आंत जाऊन सुतारकीचें काम करून राहिले. आणि तिसरे दुल्लबजी मोरे हे कांसार झाले, आणि आंतल्या लोकांच्या बायकांना बांगड्या भरून दिवस काढू लागले. त्या तिघांनीं किल्ल्यांतली इत्थंभूत खबर बाहेर मरा-