पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१६ ह्या उपचारापासून, ज्यांच्या क्षयास नुकताच आरंभ झाला आहे त्यांस मात्र गुण येतो. अखेरची पायरी पोंचलेल्या क्षयास गुण येत नाहीं. फ्रान्स देशांतले बहुतेक सर्व लोक तंबाखू ओढितात. सुमारें पाउणशें वर्षापूर्वी फ्रेंच सरकारचें तंबाखूच्या कराचें उत्पन्न सालिना सरासरी पांच कोट रुपये असे. तें आतां सरासरी सोळा कोट रुपये झालें आहे !! दरेक फ्रेंच मनुष्य सालिना सरासरी दोन पौंड तंबाखू ओढितो ! पैगंबर महंमदाच्या नाटकाचे प्रयोग रंगभूमीवर विलायतेस करण्याचा विचार होता; ते होऊं नयेत, असा बंदोबस्त करण्याविषयीं सेक्रेटरी ऑफ् स्टेट ह्यांस अर्ज करण्याकरितां मुंबईस मुसलमान लोकांची एक मोठी सभा गेल्या महिन्याच्या नवव्या तारखेस भरली होती. तसे प्रयोग करण्याचा विचार सोडून दिला आहे. मुसलमान लोकांच्या एकीचें फल पाहा. बंदुकीच्या दारूच्या ऐवजीं उपयोगी पडणारा असा एक पदार्थ शोधून काढिला आहे. त्याच्यावर दाब असला झणजे तो पाण्यासारखा पातळ असतो. परंतु तो दात्र काढिला ह्मणजे त्याची इतक्या जोरानें वाफ होते कीं, तिच्या योगानें बंदुकीच्या गोळ्या व तोफांचे गोळे दारूच्याहीपेक्षां जो- रानें, धूर व आवाज झाल्याशिवाय सोडितां येतात ! ! ही प्रवाही दारू प्रचारांत आली झणजे लढाईच्या कलेत क्रांति होऊन राष्ट्र एकमेकांशीं ल ढाई करण्यास अधिकच भिऊं लागतील. व पारिस शहरांतील एका इस्पितळांत एक चार वर्षांची मुलगी आहे. तिला गेल्या मे महिन्यापूर्वी चालतां कीं उभे राहतां येत नसे, व ती कधीं हंसत नसे. याचे कारण असें होतें कीं, तिच्या डोक्याची कंवटी बाकीच्या मुलांपेक्षां फारच लहान ह्मणजे त्यांच्या सुमारें एकतृतीयांश असल्यामुळे, आंतल्या मेंदूस अडचण झाली होती. हे कारण लक्षांत येऊन डा. लिनेलांग ह्यांनीं तिच्या कंवटीच्या मध्यभागीं आंतल्या मेंदूस धक्का न लागूं देतां एक चीर पाडून मेंदूच्या पुरती जागा मिळूं दिली. असें केल्याच्या योगानें ती मुलगी आतां इतर चांगल्या मुलांसारखी धांवती, खेळती, हंसती झाली आहे !!!