पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१५ लोक काय बोलतात. इंग्लंडांत विजेच्या गाड्या चालू झाल्या. लंडनांत ८००० स्त्रिया वर्तमानपत्रसंबंधी कामें करीत आहेत. काबूलचे अमीर व्हाइसराय साहेबांस अटक येथें लवकरच भेटणार आहेत. प्रो. वर्डस्वर्थ यांस मुंबई युनिव्हर्सिटीनें एल्. एल्. डी. ही मानाची पदवी देण्याचा ठराव केला आहे. योग्य सन्मान. न्यूयार्क शहरांत सोळा वर्षीच्या आंतल्या मुलांनी तंमाखू ओढूं नये, असा कायदा ठरला. तसा इकडे झाला तर बरें होईल. रावबहादुर बेदरकर ह्यांस दरमहा दोन हजार रुपये पगारावर होळकर सरकारानें दोन वर्षेपर्यंत मागून घेतले आहे. आतां तरी संस्थानाचें काम सुरळीत चालो. रशियाच्या बादशाहाचे ज्येष्ठ चिरंजीव ग्रीस, ईजिप्त आणि हिंदुस्थान हे देश पाहायास निघाले आहेत. ते हिंदुस्थानांत डिसेंबर अखेर २३ व्या तारिखेस येऊन पोंचतील. इंग्लंड व स्काट्लंड मिळून १७,००० मैल आगगाडीची सडक आहे. या सडकेवरून दरसाल सुमारें तीस कोटि टन माल, व सगळ्या पृथ्वीच्या लोकसंख्येच्या अर्धाइतके उतारू नेले जातात. यंदांची राष्ट्रीय सभा कलकत्त्यास त्रिव्होली बागेंत भरावयाचें ठरलें आहे. प्रत्येक प्रतिनिधीस दाहा रुपये फी पडेल. आतां मि. ह्यूम हे परत आले आहेत, ह्मणून तर खरी चळवळ सुरू होईल अशी आशा आहे. डा० रा- जेंद्रलाल मित्र हे यंदांच्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होणार. डा. कॉच यांनीं क्षयरोगावर एक रामबाण औषध शोधून काढिले आहे. ती एक प्रकारची लस असून ती देवींच्या लसीप्रमाणें आंगांत भिनवावी लागते.