पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१४ एवढ्या एका अक्षराचे अगदी " नास होतात. " जे ” वेगळे वेगळे अठरा अर्थ होतात. पाटीवर लहान लहान शब्द लिहून ते वाचायास शि- क्षक मुलाला शिकवितो; आणि त्याप्रमाणें तो आपल्या जा- ग्यावर जाऊन मोठ्यांनीं घोकीत बसतो. ते घोकतांना वि द्यार्थी मुसलमान विद्यार्थ्याप्रमाणें, मार्गे पुढे डुलत असतो. आणखी ते शब्द ह्मणून दाखवायाच्या वेळेस विद्यार्थी गु रूकडे पाठ करून उभा राहातो ! ! अगदी पहिलें वाक्य तो वाचायास शिकतो, त्याचा अर्थ असा आहे कीं, “ माणसें स्वभावतः चांगलीं आ- हेत; " नंतर त्याला असें पढवितात, की, " शाळेंत छडी छमछम वाजत नाहीं, तो शिक्षक आळशी. ह्याचा अर्थ त्याला असा सांगतात कीं, मनुष्य हें उत्तम रत्न आहे खरें; परंतु, त्यास घर्षण आवश्यक आहे. "" मुलांस अभ्यास करण्यास उत्तेजन येण्यास त्यांस चांग- ल्या चांगल्या विद्यार्थीच्या गोष्टी सांगत असतात. एका मो- ठ्या नामांकित विद्वानास अभ्यास करितांना झोंप येई; ह्म- णून त्यानें आपली शेंडी दोरीनें वरच्या बाहालास बांधिली होती; एका गरीब विद्यार्थ्यास अभ्यासास दिवा मिळेना; ह्मणून, पुष्कळ काजवे जमवून, त्यांच्या उजेडानें तो आपलें पुस्तक वाची; तिसरा एक विद्यार्थी चांदण्यांत वाचीत बसे; चवथा विद्यार्थी, डोक्यावर लांकडाच्या मो- ळीचें ओझें वाहतां वाहतां, धडा पाठ करी; आणखी पां- चवा कोणी एक विद्यार्थी गुराखी होता, तो गाईंच्या शिं गांना आपली पुस्तकें बांधी, आणि अभ्यास करी. ह्या गोष्टींनीं मुलांस मेहनत करण्यास उमेद येते.