पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०९ जागा वरच्या जमिनीच्या खालीं रिकामी होऊन, त्या ज- मिनीला कांहीं आधार राहिला नाहीं. असें झालें ह्मणजे वरची जमीन, गुरुत्वाकर्षणाच्या नियमास अनुसरून, पृ- थ्वीच्या मध्याकडे ओढली जावयाची. ह्मणजे, आकृतींत क ख ह्या ठिकाणांमधल्या जमिनीला प फ बिंदूंमधल्या जागेंत आपला समावेश करून घ्यावा लागावयाचा; आणि अर्थात्, प व फ ह्या बिंदूंमधली जागा क व ख ह्या बिंदूं- मधल्या जागेपेक्षा कमी असल्यामुळे, ती जमीन प फ येथें येऊन बसावयाची, तेव्हां वेडीवांकडी व्हावयाची; आणि असें होत असतांना पृथ्वीच्या कवचाच्या प्रत्येक भागावर त्याच्या बाजूंच्या भागांचा दाब बसावयाचा. हे सर्व कसें होत असेल याची कल्पना खाली दिलेल्या आकृतीवरून चांगली होईल. वरच्या ठिपक्यांच्या रेघांमधल्या जागेमध्यें जी जमीन होती, ती खालच्या बाजूस आल्यामुळे, चित्रांत दाखविल्याप्र- माणें तिचा चुरगळा झाला आहे. आणि असें झाल्याच्या यो- गानें पर्वत वगैरे कसे उत्पन्न होत असतील, तें सहज लक्षांत येतें. ह्याप्रमाणें पृथ्वीचें कवच दोहों बाजूंनीं चेंगरलें जात असतांना, अत्यंत तीव्र उष्णता उत्पन्न झालेली असावी, असे पुष्कळ पर्वतांच्या रचनेवरून दिसून येतें. हिमा- लयांतच केवळ नव्हे, परंतु भागीरथी नदीच्या जवळपास