पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०८ ष्टींचा विचार केला असतां चांगला होतो. पृथ्वीची आ- कृति गोल आहे, आणि तिच्या पोटांत जो रसरशीत तप्त रस आहे, तो हळूहळू गार पडत चालला आहे. कोण- त्याही तापलेल्या वस्तूची उष्णता कमी होऊं लागली, ह्म- णजे तिचा आकारही कमीकमी होत जातो, ही गोष्ट आतां सर्वोस माहीत आहे. चाकाची धांव तापविली ह्म- णजे तिच्यांत चाक सहज बसतें; परंतु ती पाण्यानें गार केली ह्मणजे तिचा घेर लागलाच कमी होतो, आणि ती त्या चाकावर आंवळून बसते. हाच विचार जर आपण आपल्या पृथ्वीला लागू करून पाहिला, तर कसें होतें पाहा. खालीं दिलेली आकृति पृथ्वीचा छेद आहे असे समजा. पृथ्वी घ क स्व ग मूळची जी रसरूप होती, ती हळूहळू थंड होऊन तिच्या पृष्ठभागावर प्राण्यांची व वनस्पतींची वसाहत होण्याजोगें जें कवच तयार झालें आहे, तें क ख ग घ हें आहे, असें समजा, आणि र हा पृथ्वीचा अंतर्गत तप्त रस आहे असें समजा. आतां असें समजा कीं, आंतला रस आणखी थंड झाल्याच्या योगानें संकोच पावला, आणि ह्या आकृतींत आंतल्या बाजूस जें कोरें कर्डे दाखविलें आहे, तितकी