Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१० पहिल्यानें पाण्याच्या योगानें चिखलरेतीचे थर बसून उ त्पन्न झालेले, आणि नंतर फार चेंगरून अत्यंत तप्त हो- ऊन वितळून खडक झालेले, असे पुष्कळ थर सांपडतात. ह्या हकीकतीवरून अर्से वाटतें कीं, आंबा किंवा दुसरें एकादें फळ वाळल्याच्या योगानें त्याच्या कातडीवर ज्या- प्रमाणें सुरकुत्या पडतात, त्याप्रमाणें पृथ्वी थंड होत गे- ल्यामुळे तिच्या पृष्ठभागावर ज्या सुरकुत्या पडल्या आहेत, त्या सुरकुत्या हे पर्वत होत. चिनांतली मुलें. चिनी लोकांत वीस वर्षांच्या वयापलीकडे कोणी स हसा अविवाहित राहात नाहींत. आणि लग्न झाल्यावर त्यांस मुळे होण्याची इच्छा फार असते. त्या संबंधानें त्यांच्यांत एक विलक्षण भोळेपण आहे. त्यांची एक देवी आहे, तिचा एक जोडा घरीं आणावयाचा, त्याची पूजाअर्चा करावयाची, आणि मुलगा झाला ह्मणजे त्याच्या प्रसादानें तो झाला असे समजून, अगदी तसे नवे दोन जोडे तयार करवून, ते, आणि तो आणलेला जोडा असे तिन्ही जोडे देवीकडे परत नेऊन द्यावयाचे !! आणखी दुसरी एक चमत्कारिक चाल आहे. गरो- दर बायकोनें मोठ्या पाहांटेस उठावें, आपल्या नवऱ्याचा पोषाक करावा, आणि अगदीं नजीकच्या विहिरीस तीन प्रदक्षिणा करून परत घरी यावें; इतकें होईपर्यंत जर ती कोणाच्या दृष्टीस पडली नाहीं, तर, तिला खचीत मुलगा व्हावयाचा, असें समजतात. मूल एक महिन्याचें झालें ह्मणजे त्याचा एक समारंभ