पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०७ केली तर, ती कशी दिसेल तें खालीं दाखविलें आहे. आ हा छेद उत्तर हिंदुस्थानांतल्या एका डोंगराच्या रांगेचा आहे. ह्यांत, अ ह्या ठिकाणीं थर थोडेसे उचलले दि- सतात, परंतु जसजसे पुढे जावें, तसतसे ते थर जास्त जास्त उचलले जाऊन वेडेवांकडे झालेले दिसतात. ठिकाणीं तर ते अगदीं उभे झाले आहेत, आणि इ ह्या ठिकाणीं, कागदाचा चुरगळा करावा त्याप्रमाणें, त्या थ- रांचा चुरगळा झालेला असतो. आ ह्या ह्याप्रमाणें, मूळच्या आडव्या असलेल्या थरांची जी अशी स्थिति झाली आहे, ती केवळ पृथ्वीच्या पोटांतल्या उष्णतेच्या जोरामुळे झालेली असावी, असें ह्मणतां येत नाहीं. कारण, केवळ त्याच जोरानें जर हे डोंगर वर आलेले असते, तर हे थर चढते मात्र झालेले असते. प रंतु, ह्या ठिकाणीं, एकादें पुस्तक आडवें ठेवून त्याच्या समोरासमोरच्या दोन कडांवर विरुद्ध दिशांकडून दाब दिला असतां ज्याप्रमाणें त्याचा चुरगळा होतो, त्याप्रमाणें ह्या एकावर एक बसलेल्या थरांचा चुरगळा झाला आहे, असें वाटतें. ह्मणजे हे डोंगर होण्यास खालून जोर लागला असेल, असे वाटत नाहीं; तर दोहों बाजूंकडून लागला असावा, असे दिसतें. आतां, हा जोर कशाच्या योगानें लागला असावा, ह्याचा विचार केला पाहिजे. ह्या गूढाचा उलगडा, पृथ्वीचा आकार, तिच्या पोटां- तली उष्णता, आणि गुरुत्वाकर्षणाची शक्ति, ह्या तीन गो-