Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०६ स्पष्ट दिसतें. आणि पृथ्वीच्या पोटांतल्या अग्नीची शक्ति हिमालयामध्यें ज्वलत्पर्वतांच्या रूपानें सध्या जरी व्यक्त होत नसली, तरी, उष्ण पाण्याचे झरे वाहतात, व वारंवार धरणीकंप होतात, ह्यांच्या रूपानें ती कधीं कधीं बाहेर पडते. पर्वतांची रांग ह्मणजे काय, हें, जे कोणी मुंबई व पुणें, किंवा मुंबई व नासिक ह्यांच्या दर्म्यान आगगाडींतून आलेगेले असतील, त्यांस सहज समजण्यासारखें आहे. प- र्वतांची रांग ह्मणजे जमिनीच्या सपाटीपासून पुष्कळ उंच जाऊन मध्येंमध्ये तुटलेला असा प्रदेश होय. हा प्रदेश बहुतकरून रुंदीनें कमी व लांबीनें फारच मोठा अ- सतो. अशा रांगेंतल्या पोटरांगा एकमेकींशीं समांतर अशा त्या प्रदेशाच्या लांबीभर पसरलेल्या असतात. आणि त्या रांगेस जे इतर फांटे फुटलेले असतात, त्यांचा, त्या रांगेशीं बहुतकरून कमजास्तमानानें काटकोन झालेला असतो. दोन डोंगरांच्या मध्ये एक दरी असते, आणि त्या डोंगरांवर पडलेल्या पाण्याची नदी त्या दरींतून वाहात असते. ह्या नदीच्या योगानें ती दरी हळूहळू जास्त जास्त खोल होत जाते, आणि त्या डोंगरांपासून सुटलेली माती, वाळू वगैरे पदार्थ त्या रांगेपलीकडच्या सपाट प्रदे- शावर किंवा समुद्रांत जाऊन त्याच्या तळावर जाऊन पस- रतात. आणि हा क्रम लाखों वर्षीपासून चालत आल्यामुळे, प्रत्येक पर्वताची उंची हळूहळू कमी होत चालली आहे. पर्वतांची रांग कोणत्या शक्तीच्या योगानें वर आलेली आहे तें जाणण्यास, त्यांच्या अंतर्गत थरांची व्यवस्था कशी आहे तें पाहावें लागतें. ह्या कारणासाठीं, उदाहरणार्थ, डोंगरांची एकादी रांग उभी कापिली आहे, अशी कल्पना