पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०५ त्या मोठाल्या पर्वतांची विशेष उंच गेलेलीं शिखरें होत, असें मनांत येतें. उदाहरणार्थ, आफ्रिकेभोवतालचा स- मुद्र कोरडा पडून त्या खंडाकडे कोणास दुरून पाहतां आलें तर, त्या खंडाच्या आकाराचा पर्वत दिसून, त्याच्या माथ्यावर एके ठिकाणीं साहाराचें मोठें मैदान, दुसरे ठि- काणीं किलिमांजारोसारखे उंचउंच डोंगर दिसून येतील. मात्र येथें हें लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, हे पर्वत आप- ल्याला किती जरी मोठे भासले, तरी, एकंदर सगळ्या पृ थ्वीच्या आकाराच्या मोठेपणाच्या मानानें, ते, फणसावर- च्या कांट्यांसारखे, फारच लहान आहेत. पृथ्वीवरचे पर्वत जे आहेत, ते इतके उंच होण्यास एक कारण पृथ्वीच्या पोटांतला अग्नि आहे, हें वर सांगितलेंच आहे. बहुतेक पर्वतांच्या संबंधानें ही गोष्ट तात्काळ लक्षांत येत नाहीं; परंतु कित्येक पर्वतांत ही गोष्ट अगदी स्पष्ट दिसून येते. असे पर्वत ह्मटले ह्मणजे ज्वालामुखी पर्वत होत. त्यांच्या मुखांतून वारंवार दगडांचा रस, राख इत्यादि पदार्थ इतके बाहेर येतात कीं, जमिनी- वर त्यांची भर पडून ती जास्त वाढते. पुष्कळ ज्वालामुखी पर्वत समुद्राच्या तळापासून उचलत उचलत येऊन त्यांचीं वेगळीं बेटे झाली आहेत. ह्याची उदाहरणें ऐस्लंड, अझोर्स व कनेरी बेटें होत. हल्लीं चालू असे ज्वलत्पर्वत एकमेकांपासून पुष्कळ अंतरावर सांपडतात खरे; परंतु हिमालयासारख्या मोठ्या पर्वतांत कित्येक ठिकाणीं ज्वलत्पर्वतांपासून उत्पन्न झालेले खडक सांपडतात. ह्यावरून, हिमालय हल्लीं जरी प्रत्यक्ष ज्वलत्पर्वत नसला, तरी, प्राचीन काळीं, कोट्यवधि वर्षीपूर्वी, त्यांत तसा कांहीं प्रकार असला पाहिजे, असें १८ -